हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी या लोकप्रिय वाहिनीवरील अत्यंत गाजलेली मराठी मालिका म्हणून देवमाणूस’ चा उल्लेख केला जातो. या मालिकेने एका अश्या घटनेवर भाष्य केले आहे जी घटना खरोखर अनेक लोकांनी आपल्या डोळ्यांनी घडताना पाहिली आहे. अर्थातच हि घटना सत्य घटनेशी प्रेरित असल्यामुळे लोकांनीही यात रस घेतला. परिणामी देवमाणूस या मालिकेचा प्रेक्षकवर्ग दिवसागणिक वाढला. चांगूलपणाच्या कातड्यात लांडग्याची पारख करणे कठीण हे या मालिकेतून समजते. देवमाणूसच्या पहिल्या पर्वानंतर आता लवकरच देवमाणूस २ येत आहे. याचे प्रोमोज पाहता आता या रक्तरंजित खेळाचे नवे पर्व सारे रहस्य उघड करेल का? असा प्रश्न लोकांना पडतोय.
View this post on Instagram
अनेकदा एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते. लहान सहन गोष्टीत मदत करणारी ती व्यक्ती आपल्याला तारणहार वाटू लागते. पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या या वृत्तीविषयी भाष्य करणारी देवमाणूस ही मालिका प्रेक्षकांसमोर आली आणि अल्पावधीतच प्रेक्षकांनी ह्या मालिकेला डोक्यावर घेतलं. एक बोगस डॉक्टर जो गावातल्या भाबड्या लोकांना आपल्या बोलघेवड्या स्वभावाने भूरळ पाडतो. अगदी पूर्ण गावात देवमाणूस म्हणून त्याची ख्याती पसरते आणि देवमाणसाच्या बुरख्याआड लपलेला चेहेरा ज्याची कोणी कल्पनाही केलेली नसते. यानंतर रक्ताळलेल्या हातांचा आणि अमानुष वृत्तीचा हा खेळ कधी संपणार असे लोकांना वाटू लागले असताना १५ ऑगस्ट रोजी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. यानंतर अखेर आता उर्वरित भाग देवमाणूस २ च्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळेल.
झी मराठीच्या अधिकृत पेजवर प्रदर्शित झालेल्या प्रोमो व्हिडिओत दिसून येत आहे कि डॉ. अजितकुमार देवचा अर्धा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याने प्रेक्षकांचे लक्ष असे काही ओढून घेतले आहे कि आता पुढे काय? डॉक्टर मेला? का देवमाणूस होऊन हा कुठे दुसरीकडे घाट करत असेल? काय असेल या प्रोमोमगील सत्य. तर दुसऱ्या प्रोमोमध्ये डॉक्टरच्या नावाची पाटी आणि दवाखाना शाबूत असतो. कुणीतरी त्याच्या नावाची पाटी काढून टाकतो. आता या प्रोमोचा अर्थ काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. यामुळे चाहत्यांमध्ये चर्चा रंगली ती म्हणजे देवमाणूसच्या दुसऱ्या भागाची. प्रोमोमुळे त्यांची उत्सुकता इतकी वाढली आहे कि आता कधी एकदा हि मालिका प्रदर्शित होते असे त्यांना झाले आहे.
Discussion about this post