Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘सॅम बहादुर’चे चित्रीकरण पूर्ण; भूमिकेविषयी बोलताना विकी कौशल म्हणाला, ‘एका खऱ्या महापुरुषाच्या..’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 18, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sam Bahadur
0
SHARES
56
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळात विविध चित्रपटांमधून आपले अभिनय कौशल्य दाखवत अभिनेता विकी कौशलने यशाची एक उंच भरारी घेतली आहे. कधी गंभीर तर कधी खोडकर भूमिकांमधून प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेला विकी आता लवकरच अत्यंत महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. विकी कौशलने नुकतेच त्याचा आगामी चित्रपट ‘सॅम बहादूर’चे चित्रीकरण पूर्ण केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा चित्रपट चर्चेत आहे. या वर्षात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता विकी कौशल याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅन्डल इंस्टाग्रामवर चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्याची माहिती देणारी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तो प्रचंड भावुक झाल्याचे दिसून आले.

View this post on Instagram

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

अभिनेता विकी कौशलने शेअर केलेल्या पोस्टसोबत कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे कि, ‘कृतज्ञता.. कृतज्ञता आणि फक्त कृतज्ञता… एका खऱ्या महापुरुषाच्या जीवनाचे चित्रण करण्यासाठी या प्रक्रियेचा एक भाग होता आले. खूप काही मला जगायला मिळालं, खूप काही शिकायला मिळालं… खूप काही तुमच्या सगळ्यांसमोर आणायचं आहे. मेघना, रॉनी, माझे उत्कृष्ट कलाकार, अतुलनीय टीम, माणेकशॉ कुटुंब, भारतीय सैन्या आणि सॅम एच. एफ. जे. माणेकशॉ यांना धन्यवाद.’

View this post on Instagram

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

‘सॅम बहादूर’ हा चित्रपट सॅम माणेकशॉ यांचा चरित्रपट असून यामध्ये त्यांची मुख्य भूमिका अभिनेता विकी कौशल साकारतो आहे. त्याच्यासह या चित्रपटात सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेख या अभिनेत्री दिसणार आहेत. सान्या सॅम माणेकशॉ यांच्या पत्नीची, तर फातिमा पंतप्रधान इंदिरा गांधी यांची व्यक्तिरेखा साकारणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची एक झलक सोशल मीडियावर शेअर करण्यात आली होती. ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा चित्रपट १ डिसेंबर २०२३ रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे, असे सांगितले जात आहे.

Tags: Bollywood Upcoming MovieInstagram PostSam BahadurVicky KaushalViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group