Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बच्चे कंपनीचा फेव्हरेट सुपर हिरो येतोय; हृतिक रोशनच्या ‘Krrish- 4’बाबत मोठी अपडेट समोर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 2, 2023
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Krrish 4
0
SHARES
516
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बच्चे कंपनीचा फेव्हरेट सुपर हिरो ‘क्रिश’ आता पुन्हा एकदा त्यांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज होतो आहे. बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनच्या ‘क्रिश’ या सिनेमाच्या सिरीजचा आगामी चौथा भाग या वर्षात रिलीज होणार असल्याची चर्चा अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात सुरु झाली होती. या सीरिजचे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत चाहते आहेत. त्यामुळे क्रिश ४ येणार हे ऐकताच हृतिकच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता पहायला मिळाली. गेले बरेच दिवस या सिनेमाबद्दल फारशी काही चर्चा नव्हती मात्र आता पुन्हा एकदा क्रिश ४ च्या चित्रीकरणाबाबत काही अपडेट समोर येऊ लागले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

अभिनेता हृतिक रोशनच्या ‘क्रिश ४’ या सिनेमाचं शूटिंग पुन्हा एकदा ट्रॅकवर आले आहे. येत्या वर्षात हृतिकचा ‘वॉर २’देखील येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येत्या काळात हृतिकचे हे २ सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सिद्धार्थ आनंद निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘अग्निपथ’ फेम करण मल्होत्रा ​​करणार आहेत अशीही माहिती समोर येत आहे. या सिनेमाबद्दल अभिनेता हृतिक रोशन याने अलीकडेच जानेवारी महिन्यात माहिती दिली होती. यानंतर आता ‘क्रिश ४’ याच वर्षात शूट होऊन रिलीज करण्याबाबत मोठी चर्चा आहे.

Hrithik Roshan’s #Krrish4 is back on track, to start shooting next year post WAR 2.

Agneepath fame Karan Malhotra to direct the film, produced by Siddharth Anand. pic.twitter.com/72tbWpMoGb

— LetsCinema (@letscinema) May 1, 2023

अभिनेता हृतिक रोशन याने दिलेल्या माहितीनुसार, ‘क्रिश ४ बद्दल सर्व गोष्टी ठरल्या आहेत. शुटिंगचं काम सुद्धा पूर्ण झालंय. फक्त टेक्निकल माध्यमांवर काम करणं बाकी आहे. काही अडचणी दूर करायच्या आहेत. अशा सर्व गोष्टींवर काम झालं की, २०२३ च्या अखेरीस सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकेल’. यानुसार ‘क्रिश ४’चं शूटिंग एव्हाना पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र ‘वॉर २’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे ह्रतिकला ‘क्रिश ४’साठी वेळ देता आलेला नाही. परिणामी ‘क्रिश ४’चे प्रदर्शन लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. अद्याप या सिनेमात कोणकोणते कलाकार झळकणार आहेत याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

Tags: Bollywood Upcoming MovieHrithik RoshanKrrish 4Twitter Trendingviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group