हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| आजकाल बरेच निर्माते आणि दिग्दर्शक सामाजिक भान जपणारे, समाजाप्रती असलेली कर्तव्ये लक्षात घेऊन त्याचे भान ठेऊन मनोरंजनासोबत आवश्यक संदेश देण्याचा प्रयत्न करताना दिसतात. काही चित्रपट अगदी कृतीच्या माध्यमातूनदेखील समाजासमोर सादर झाले आहेत. जसे की, आगामी ‘आश्रय‘ या मराठी चित्रपटाच्या टिमने माहेर या संस्थेला भेट देत एक मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी माहेरवासीयांसोबत संपूर्ण दिवस घालवत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणून एक वेगळाच आनंद देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
https://fb.watch/bSCMmSn3I6/
संकल्प मोशन फिल्म्स प्रस्तुत ‘आश्रय’ या मराठी चित्रपटाची निर्मिती अभिषेक संजय फडे यांनी केली आहे. पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक येथे वसलेल्या नावाच्या सामाजिक संस्थेला ‘आश्रय’ सिनेमाच्या संपूर्ण क्रू टीमने भेट दिली आहे. सन १९९७ मध्ये सिस्टर ब्ल्यूसो कुरियन यांनी वढू बुद्रुक येथे ‘माहेर’ या समाजासाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थेची स्थापना केली. आजवर आंतरधर्मीय आणि जातीमुक्त भारतीय संस्था असलेल्या माहेरनं विविध क्षेत्रांत सामाजिक कार्य केले आहे. आज सुमारे १२०० लोकांचे आश्रयस्थान असलेल्या माहेरला ‘आश्रय’च्या टिमने भेट देत त्यांचा उत्साह वाढवला आहे. ‘आश्रय’च्या टिमने माहेरला पंखे आणि कुकरच्या स्वरूपात भेटवस्तू दिल्या.
यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. त्यांनी संपूर्ण दिवस माहेर वासियांसोबत घालवला आणि भरपूर गप्पा, मज्जा आणि मस्तीसुद्धा केली. अनाथांना आश्रय देणाऱ्या माहेरभेटीचं औचित्य साधत ‘आश्रय’चं नवं पोस्टरही रिलीज करण्यात आलं आहे. यातही माहेर संस्थेचे रमेश काशिनाथ चौधरी, विक्रम भुजबळ, प्रशांत गायकवाड, माया शेळके उपस्थित होते. तर ‘आश्रय’ सिनेमाच्या टीममधील निर्माते अभिषेक संजय फडे, गीतकार आणि गायिका आरती अभिषेक फडे आणि दिग्दर्शक संतोष साहेबराव कापसे पटकथा-संवाद दीक्षित सरवदे, कलाकार अमय बर्वे, श्वेता पगार तसेच गणेश सटाले इत्यादी उपस्थित होते.
Discussion about this post