Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

तगड्या स्टारकास्टसह ‘सातारचा सलमान’ धडकणार; भन्नाट माणसं.. ओळखीचे चेहरे पब्लिकला भेटायला येणार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 25, 2023
in Trending, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Satarcha Salman
0
SHARES
281
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मोठ्या पडद्यावर झळकायाचे स्वप्न आपल्यापैकी अनेक जण बघतात. पण हे स्वप्न काही लोकांचं सत्यात उतरतं तर काहींचं स्वप्नच राहतं. असाच हिरो बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका खेड्यातील सामान्य तरुणावर आधारित ‘सातारचा सलमान’ हा चित्रपट येत्या ३ मार्च २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘स्वप्नं बघितली तरंच पूर्ण होतात!’ अशी भावना असणाऱ्या या तरुणाची हिरो बनण्याची जिद्द, त्यासाठीची त्याची धडपड आणि अखेर त्याचे त्याची स्वप्नपूर्ती होते का? हे आपल्याला यात पाहायला मिळेल. या चित्रपटाला एकापेक्षा एक वेड्या आणि भन्नाट कलाकारांची साथ लाभली आहे. त्यामुळे रिलीजआधी हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Dr. SUYOG GORHE | कोनांब्याचा सुयोग गोऱ्हे (@suyogsrg)

काही दिवसांपूर्वीच प्रकाश सिंघी, टेक्सास स्टुडिओज निर्मित, रिलायन्स एन्टरटेन्मेंट प्रदर्शित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सातारचा सलमान’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हिरो बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य तरुणाची ही कथा आहे. त्याचा सामान्य तरुण ते हिरो बनण्यापर्यंतचा रंजक प्रवास यात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या ट्रेलरमध्ये चित्रपटाकडे आकर्षित करणारी स्टार कास्ट समोर आली आहे. या चित्रपटात ओळखीचे आणि लोकप्रिय चेहरे आपल्या भेटीला येत आहेत. यामध्ये सुयोग गोऱ्हे, शिवानी सुर्वे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे यांच्या प्रमुख भूमिका असून त्यांच्या जबरदस्त अभिनयाची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Shivani Surve | मुंबईची शिवानी सुर्वे (@iam_shivanisurve)

तसेच या ट्रेलरमध्ये आणखी एक गोष्ट प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहे. ती म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील काही नामवंत कलाकार. होय. या कलाकारांशिवाय ‘सातारचा सलमान’ या चित्रपटात महेश मांजरेकर, सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, अनिकेत विश्वासराव, नेहा महाजन, कमलेश सावंत हे प्रसिद्ध चेहरेही झळकले आहेत. त्यामुळे आता प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे ती, या कलाकारांच्या ‘सातारच्या सलमान’मध्ये नेमक्या काय भूमिका आहेत..? हे जाणून घेण्याची. पण यासाठी मात्र प्रेक्षकांना ३ मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Tags: Hemant DhomeInstagram PostUpcoming Marathi MovieViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group