Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

रितेशच्या ‘वेड लावलंय’ गाण्याची परदेशीयांना भुरळ; अमेरिकन बाप लेकाचा व्हिडीओ व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 2, 2023
in Trending, Hot News, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Ved Lavlay
0
SHARES
159
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या शुक्रवारी दिनांक ३० डिसेंबर २०२२ रोजी बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख यांचा ‘वेड’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वत्र चित्रपटाचे कथानक, रितेश जिनिलियाच्या केमिस्ट्रीची आणि गाण्यांची हवा आहे. हि हवा आता परदेशातही जाऊन पोहोचली आहे. या चित्रपटातील वेड लावलंय गं एव्हढं ट्रेंडिंगवर आहे कि परदेशीयांनाही त्याची भुरळ पडली आहे.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

सध्या सोशल मीडियावर रितेश देशमुखच्या वेड चित्रपटातील ‘मला वेड लावलंय’ या गाण्याचा एक वेगळाच ट्रेंड सुरु आहे. ‘मला वेड लावलंय’ या गाण्याच्या हूक स्टेपवर डान्स करताना अनेक कलाकार, रिल स्टार मंडळी व्हिडिओ शेअर करताना दिसत आहेत. या गाण्यावर थिरकण्याचा मोह ‘डान्सिंग डॅड’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या परदेशातील डान्सरलाही आवरता आला नाही. तर या परदेशी इंस्टा स्टारनेसुद्धा सोशल मीडियावर रितेश देशमुखच्या वेड चित्रपटातील ‘मला वेड लावलंय’ या गाण्याच्या हुक स्टेप करीत व्हिडीओ शेअर केला आहे. जो चांगलाच व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Ricky Pond (@ricky.pond)

सोशल मीडियावर ‘डान्सिंग डॅड’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रिकी पॉन्डने हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो आपल्या मुलासोबत डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये या बाप लेकाने ‘मला वेड लावलंय’ गाण्याच्या हुक स्टेप हुबेहूब मॅच करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. अमेरिकेतील वाशिंगटनचा रिकी पॉन्ड हा बॉलिवूडच्या अनेक गाण्यांवर अनेकदा रिल्स बनविताना दिसतो. परदेशासह भारतातही त्याच्या व्हिडीओ चांगल्याच व्हायरल होत असतात. यामुळे अनेक भारतीय लोकांचा देखील त्याच्या फॉलोवर्समध्ये समावेश आहे.

Tags: Instagram PostInstagram ReelRiteish deshmukhVedViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group