हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मी असो नसो.. हा देश राहिला पाहिजे.. देशाने मोठी झेप घेतली पाहिजे आणि त्यासाठी वाट्टेल तो संघर्ष करायला मी तयार आहे, असे वक्तव्य करणाऱ्या माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे आजही स्मरणात आहेत. पण पुढील पिढीला ते माहित असावे यासाठी त्यांचा जीवन संघर्ष सर्वाना माहित असणे आवश्यक आहे. याच भावनेतून अटळ बिहारी वाजपेयी यांची जीवनगाथा अर्थात बायोपिक चित्रपट बनविला जाणार आहे. याची अलीकडेच घोषणा करण्यात आली असून चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबाबत माहिती दिली आहे.
प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी अधिकृत ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. वाजपेयी हे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान होते. आत्मविश्वास आणि संयमीपणा हे त्यांचे असे गुण होते ज्यांना आदर्श घेण्यासारखा आहे. मुळात अटल बिहारी वाजपेयी हे साहित्यिक आणि कवी होते. त्यांच्या अशा अष्टपैली व्यक्तिमत्वाचे करावे तितके कौतुक कमी. म्हणून हे व्यक्तिमत्व सर्वाना कळावे यासाठी त्यांचा बायोपिक चित्रपट बनविला जात आहे. विनोद भानुशाली आणि संदीप सिंह यांनी या बायोपिकची निर्मिती केली आहे. शिवाय त्याचे मोशन पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे. हे पोस्टर हिंदी आणि इंग्रजी अशा २ भाषेत प्रदर्शित केले आहे.
देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे १६ ऑगस्ट २०१८ रोजी निधन झाले आणि सर्वत्र शोककळा निर्माण झाली. हा चित्रपट अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना विनोद म्हणाले, “मी आयुष्यभर अटलजींचा खूप मोठा चाहता राहिलो. एक जन्मजात नेता, एक उत्कृष्ट राजकारणी, एक द्रष्टा. श्री अटलबिहारी वाजपेयीजी हे वरील सर्व होते. आपल्या राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान आहे. अतुलनीय, आणि भानुशाली स्टुडिओ लिमिटेड त्यांचा वारसा रुपेरी पडद्यावर आणत आहे हा आमचा मोठा सन्मान आहे.”
Discussion about this post