Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

नव्या वर्षात बॉलिवूडकर OTT गाजवणार; ‘या’ अभिनेत्री घेऊन येतायत रंजक सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 24, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, वेबसिरीज, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Bollywood Actresses
0
SHARES
126
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपण सारेच जाणतो कि गेल्या काही काळापासून सिनेमा चित्रपटगृहात पहायला जाण्यापेक्षा घरबसल्या पाहण्याचा आनंद घेणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मची व्याप्ती वाढतच चालली आहे. या वर्षभरात ओटीटीने अनेक कमाल वेब सिरीज तसेच रोमांचक चित्रपट दिले. यानंतर आता नव्या वर्षाची चाहूल लागली आहे. अगदी काहीच दिवसांत नवे वर्ष २०२३ सुरु होईल. गेल्या वर्षात माधुरी दीक्षित, अजय देवगण, सुनील शेट्टी या सारख्या जबरदस्त कलाकारांनी ओटीटीवर पदार्पण केले. यानंतर आता नव्या वर्षात काही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री ओटीटीवर पदार्पण करीत आहेत. तर या कोण आहेत आणि त्या कोणत्या सिरीज घेऊन येत आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

View this post on Instagram

A post shared by Urmila Matondkar (@urmilamatondkarofficial)

1. उर्मिला मातोंडकर – ‘तिवारी’

बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर येत्या नव्या वर्षात ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तिच्या आगामी वेब सीरिजचे नाव ‘तिवारी’ असे आहे. हि सिरीज आई आणि मुलीच्या भावनिक नात्यावर आधारित अशी एक थ्रिलर ड्रामा सिरीज आहे. या सिरिजची कथा एका छोट्या शहराच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. तर सीरिजचे दिग्दर्शन सौरभ वर्मा यांनी केले आहे. अद्याप निर्मात्यांनी हि सिरीज कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी रिलीज होईल याची घोषणा केलेली नाही.

 

View this post on Instagram

A post shared by Kajol Devgan (@kajol)

2. काजोल – ‘द गुड वाईफ’

बॉलिवूड अभिनेत्री काजोलने आतापर्यंत अनेक चित्रपट तसेच काही शॉर्टफिल्मदेखील केल्या आहेत. तिने रेणुका शहाणे दिग्दर्शित ‘त्रिभंगा’ या सिनेमातून ओटीटी विश्वात पदार्पण केले आहे. पण आता येत्या वर्षात काजोल अमेरिकन कोर्टरूम ड्रामा सिरीज ‘द गुड वाईफ’च्या हिंदी रिमेकसह वेब सीरिजमध्ये पदार्पण करतेय. या सीरिजचे दिग्दर्शन सुपरण वर्मा यांचे असून सिरिजमध्ये काजोलशिवाय कुब्बरा सैत, शीबा चड्ढा, आमिर अलीदेखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

 

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

3. सोनाक्षी सिन्हा – ‘दहाड’

बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा या नव्या वर्षात ‘दहाड’ या नव्या कोऱ्या वेब सिरीजच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे. ही सिरीज अमॅझॉन प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. कधी ते अजून सांगितलेले नाही. पण या सिरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा पोलीस अधिकारी अंजली भट्टची भूमिका साकारत आहे आणि कथानक फारच रंजक आहे. या सीरिजचे दिग्दर्शन रीमा कागती करत आहेत आणि सिरिजमध्ये सोनाक्षीशिवाय विजय वर्मा, गुलशन देवैया आणि सोहम शाह यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.

 

View this post on Instagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

4. करीना कपूर खान – ‘द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान हि २०२३ मध्ये द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’ या सिरीजद्वारे ओटीटीवर पदार्पण करतेय. हि सिरीज एका जपानी लेखकाच्या ‘द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’ या कादंबरीवर आधारित आहे. या सीरिजचे दिग्दर्शन सुजॉय घोष यांनी केले आहे. तर या सिरिजमध्ये करीना कपूर खानशिवाय विजय वर्मा आणि जयदीप अहलावत हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. माहितीनुसार हि सिरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असून अद्याप याची रिलीज डेट सांगितलेली नाही.

 

View this post on Instagram

A post shared by GRAZIA India (@graziaindia)

5. सारा अली खान – ‘ए वतन मेरे वतन’

युथ अभिनेत्रींच्या यादीतील बहुचर्चित नाव सारा अली खान भले मोठ्या पडद्यावर फार कमी चमकली असेल. पण लवकरच अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या माध्यमातून ती ओटीटी प्लॅटफॉर्मवर नशीब आजमावणार आहे. ‘ए वतन मेरे वतन’ या वेब सीरिजद्वारे ती ओटीटीवर पदार्पण करतेय. या सीरिजची निर्मिती करण जोहर करत असून दिग्दर्शन कन्नन अय्यर करत आहे. हि सिरीज १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीवर आधारित आहे. यामध्ये सारा अली खान हि उषा मेहता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या स्वातंत्र्य लढ्यात गुप्त रेडिओ ऑपरेटर होत्या.

Tags: Instagram PostkajolKareena Kapoor-khanOTT DebutSara Ali KhanSonkashi Sinhaurmila matondkar
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group