हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात आजतागायत अनेक दिग्गज अभिनेत्यांनी अनेक मनाचे पुरस्कार पटकावले. देशात नव्हे तर विदेशातही डंका गाजवला. त्यांच्या ऑनस्क्रीन कामाचे कौतुक जगभरात सर्वत्र झाले. या यादीत अनेक महान कलाकारांची नावे आहेत. पण आता या यादीत आणखी एक नाव समाविष्ट होत आहे. ते म्हणजे ज्युनियर एनटीआर. होय. या पिढीतील सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ज्युनिअर एनटीआरचे नाव घेतले जाते. राजामौली यांच्या RRR नंतर तर एनटीआरच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली आहे. आता या अभिनेत्याने ऑस्करच्या प्रिडिक्शन यादीतदेखील मानाचे स्थान पटकावले आहे.
#ManOfMassesNTR
For the first time in Indian history an Indian actor entered in Top10 Oscars Prediction List @tarak9999 💥💥💥💥#RRRMovie #RRR #RRRForOscars pic.twitter.com/rJmNQF6ijR— jagadeeshchowdary (@jagadee86071428) January 5, 2023
हा क्षण अतिशय अभिमानाचा आहे. कारण ज्युनिअर एनटीएरचा आरआरआर हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलाच. शिवाय या चित्रपटाची ऑस्करसाठी निवडदेखील झाली आणि आता याच चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या एनटीआरला प्रसिद्ध व्हरायटी मॅगझीनने टॉप १० कलाकारांमध्ये स्थान दिले आहे. खरंतर, अद्याप ही यादी अधिकृतरीत्या अजून जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, या मॅगझीनच्या अंदाजानुसार ज्युनिअर एनटीआर टॉप १० च्या यादीत आपले स्थान मिळवू शकतो, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
असं बोललं जात आहे कि, अभिनेता ज्युनिअर एनटीआरने ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ या विभागात टॉप १० कलाकारांच्या यादीत मानाचे स्थान मिळवले आहे. तो ह्यू जॅकमन (द सन) आणि विल स्मिथ (एमॅन्सिपेशन) या सारख्या कलाकारांच्या यादीत जाऊन स्थित झाला आहे. ज्युनियर एनटीआरबाबत या गोष्टीची माहिती मिळताच, ‘ऑस्करसाठी आरआरआर’ असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करू लागला. माहितीनुसार, इतिहासात पहिल्यांदाच एका भारतीय अभिनेत्याने ऑस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या टॉप १० यादीत स्थान मिळवले आहे. त्यामुळे भारतासाठी हा खरोखरच अभिमानाचा क्षण आहे. या वर्षीचा ऑस्कर १२ मार्च २०२३ रोजी डॉल्बी थिएटरमधून प्रक्षेपित केला जाईल.
Discussion about this post