हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात विविध ठिकाणी विविध बाबींमूळे संकटजाण्या परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान श्रीलंका हा असा देश आहे जो सध्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आणि गंभीर संकटातून जात आहे. संपूर्ण देश आणि तेथील नागरिकांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आणि हलाखीची झाली आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर विविध वक्तव्ये केली जात आहेत. शिवाय जगभरातील राजकीय मंडळीसुद्धा याबाबत बोलत आहेत. यानंतर आता श्रीलंकन अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने आपल्या भावना व्यक्त करीत इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. यात तिने श्रीलंकेतील लोकांना पाठिंब्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
या पोस्टमध्ये जॅकलीनने एकसंघटनचा फोटो शेअर केला आहे. यासोबत तिने लिहिले आहे की, ‘एक श्रीलंकन असल्याच्या नात्याने माझा देश आणि तिथे राहणाऱ्या लोकांना अशा परिस्थितीत पाहणे ही दुःखद बाब आहे. जेव्हापासून हे संकट सुरू झाले आहे, मला जगभरातून बऱ्याच गोष्टी ऐकू आल्या आहेत. मी सांगू इच्छिते की, काहीही पाहिल्यानंतर घाईत निर्णय देऊ नका. जगाला आणि माझ्या देशातील लोकांना कोणाच्या निर्णयाची गरज नाहीये. त्यांना दयाळूपणा आणि पाठिंब्याची आवश्यकता आहे. त्यांच्या ताकदीची आणि भल्यासाठी २ मिनिटे शांततेत केलेली प्रार्थना तुम्हाला त्यांच्या अधिक जवळ घेऊन जाईल.’
पुढे जॅकलीनने लिहिले की, ‘मी आपला देश आणि देशवासियांना सांगू इच्छिते की, लवकरच ही समस्या संपेल अशी मी आशा करते. याचा असा उपाय निघू देत, ज्यामुळे सर्वांना शांती मिळो आणि लोकांचे भले होवो. या समस्येचा सामना करणाऱ्यासाठी सर्वांना ताकद मिळू देत, अशी माझी इच्छा आहे.’ माहितीनुसार जॅकलीन फर्नांडिसचे वडील एल रॉय हे श्रीलंकन आहेत. महाविद्यालयीन शिक्षणानंतर जॅकलीनने श्रीलंकेतील नाटकांमध्ये काम केले होते. यानंतर तिने मिस युनिव्हर्स श्रीलंका २००६ चा ‘किताब देखील जिंकला होता. पुढे तिने वर्ल्ड मिस युनिव्हर्स २००६मध्ये श्रीलंकेचे प्रतिनिधित्वदेखील केले होते.
Discussion about this post