हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठीच नव्हे तर बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतही आपल्या कणखर व्यक्तिमत्वाने एक विशेष जागा निर्माण करणारे प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर येत्या काळात ऐतिहासिक चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे नाव ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ असे असून या चित्रपटाच्या कार्याचा शुभारंभ राज ठाकरे यांच्या हस्ते क्लॅप घेऊन करण्यात आला. या चित्रपटाची खासियत म्हणजे चित्रपटातील अत्यंत महत्वपूर्ण भूमिका म्हणजे महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आव्हानात्मक भूमिका बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार साकारणार आहे.
त्यामुळे प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवाय या चित्रपटातील ते सात वीर मावळे कोण साकारणार याबाबतही एक वेगळीच उत्सुकता सगळ्यांमध्ये आहे. चला तर जाणून घेऊया त्या वीर मावळ्यांच्या भूमिकेत कोण कलाकार दिसणार ते खालीलप्रमाणे:-
चित्रपटाचा जीव असणाऱ्या ‘त्या’ 7 मावळ्यांची भूमिका ‘हे’ कलाकार साकारणार
१) ‘प्रवीण तरडे’ साकारणार वीर मावळे ‘प्रतापराव गुजर’
२) ‘सत्या मांजरेकर’ साकारणार वीर मावळे ‘दत्ताची पागे’
३) ‘विराट मडके’ साकारणार वीर मावळे ‘जीवाजी पाटील’
४) ‘हार्दिक जोशी’ साकारणार वीर मावळे ‘मल्हारी लोखंडे’
५) ‘विशाल निकम’ साकारणार वीर मावळे ‘चंद्राजी कोठार’
६) ‘जय दुधाणे’ साकारणार वीर मावळे ‘तुळजा जामकर’
७) ‘उत्कर्ष शिंदे’ – सूर्याजी दांडकर
‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा मराठमोळा ऐतिहासिक चित्रपट मल्टीस्टारर चित्रपट असून यातील प्रत्येक पात्र साकारणारा कलाकार तोडीचा आहे. त्यामुळे चित्रपटाबाबत एक वेगळीच उत्सुकता सगळ्यांमध्ये निर्माण झाली आहे. या चित्रपटाचा बुधवारी शुभारंभ झाला आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
हा चित्रपट अत्यंत भव्य असणार असून मराठीसह तेलुगू आणि हिंदी भाषांमध्येदेखील तो प्रदर्शित होणार आहे. वसिम कुरेशी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर लेखन पराग कुलकर्णी आणि संगीत हितेश मोडक यांनी दिले आहे. लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार असून हा चित्रपट पुढील वर्षी दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.
Discussion about this post