हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळापासून मराठी सिने सृष्टीचा कल ऐतिहासिक कथांकडे वळताना आपण पाहिला आहे. ज्यामुळे अनेक ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती झाली. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे आद्य दैवत. त्यांचा इतिहास फार मोठा आणि प्रेरणादायी आहे. जो भव्य स्वरूपात प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी निर्माते- दिग्दर्शक सातत्याने धडपडत आहेत. ‘पावनखिंड’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘शिवप्रताप गरुडझेप’, ‘शेर शिवराज’, ‘हर हर महादेव’ यांसारखे ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि गाजले. यानंतर आता आणखी एका ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा करीत पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटाचे नाव ‘वीर मुरारबाजी’ असे आहे.
नुकतंच ‘वीर मुरारबाजी’ या ऐतिहासिक चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर पुरंदरचा रणसंग्राम रुपेरी पडद्यावरून भव्य स्वरूपात येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर चित्रपटाच्या टीमने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण केले असून चित्रपटातील मुख्य भूमिकेत अभिनेता अंकित मोहन दिसणार आहे. अर्थात या चित्रपटात अभिनेता अंकित मोहन मुरारबाजी देशपांडे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी त्याने ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ यांसारख्या ऐतिहासिक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली.
‘पावनखिंड’ चित्रपटातील अंकितच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या चित्रपटात त्याने रायाजीराव बांदल यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले आणि त्यामुळे आता जेव्हा अंकित पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेत झळकणार आहे तेव्हा प्रेक्षक त्याला पहायला उत्सुक आहेत. अंकितच्या वाढदिवशी हे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. अंकिताने पोस्टर शेर करताना लिहिले होते कि, ‘मुज़रा महाराज , सांगा काय करु. माझ्या वाढदिवशी माझ्या आगामी चित्रपट ‘ ‘वीर मुरारबाजी’ चे पहिले लूक पोस्टर जाहीर करताना मी खूप आनंदी, कृतज्ञ आणि धन्य आहे. लवकरच चित्रपटगृहात भेटू. प्रेम आणि आशीर्वाद पाठवत राहा. छत्रपती शिवाजी महाराज की जय.’
Discussion about this post