हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस १६’च्या घरात सध्या फॅमिली विक सुरु आहे. या निमित्ताने घरातील प्रत्येक स्पर्धकांच्या कुटुंबीयांचे बिग बॉसच्या घरात आगमन झाले आहे. बिग बॉसच्या या पर्वाचा महाअंतिम सोहळा फेब्रुवारी महिन्यामध्ये पार पडणार आहे. त्यामुळे आता घरातील सदस्यांमध्ये स्पर्धा अटीतटीची आहे. टॉप ५ मध्ये कोण असणार..? याबाबत प्रत्येकालाच उत्सुकता आहे.
त्याआधी बिग बॉसच्या घरातील अत्यंत हृदयस्पर्शी आठवडा सध्या सुरु आहे आणि या आठवड्यात घरातून बाहेर होण्यासाठी निम्रित कौर अहलुवालिया, श्रीजीता डे, सुंबुल तौकीर खान आणि एमसी स्टॅन नॉमिनेट झाले आहेत. तर यांच्यापैकी घरातून कोण बाहेर होणार..? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
दरम्यान कालच्या भागात साजिद खानची बहीण आणि बॉलिवूड सिने इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शिका फराह खान घरात एंटर झाली. तिने घरात एकदम आनंदाचे वातावरण निर्माण केले. तसेच शिवची आई घरात एंटर झाली आणि तिने सगळ्यांवर प्रेमाचा वर्षाव केला. याशिवाय प्रियांका चहर चौधरीचा भाऊ घरात आला आणि त्याला पाहून प्रियांकाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. या सगळ्यात बिग बॉसने नेहमीप्रमाणे खेळ खेळला आणि या कुटुंबीयांच्या हातात नॉमिनेशन दिले. पण एका वेगळ्या ट्विस्टसह हे नॉमिनेशन पार पडले. कारण यावेळी नॉमिनेट झाल्यामुळे बिग बॉसच्या विजेत्याच्या बक्षिसातील काही रक्कम परत आली आहे. यावेळी ज्यांचे कुटुंबीय घरात आले आहेत त्यांच्या जागेवर कुटुंबातील सदस्यांनी नॉमिनेशन प्रक्रियेत सहभाग घेतला.
बिग बॉसने घरातील सदस्यांना काही कॅटेगरीमध्ये विभागले होते. यामध्ये हायपर ऍक्टिव्ह कॅटेगरीमध्ये प्रियांका, साजिद, शिव आणि अर्चना यांच्या नावाचा समावेश होता. हि कॅटेगरी नॉमिनेट केल्यास ५ लाख रुपये परत येणार होते. तर ऍक्टिव्ह कॅटेगरीमध्ये सौंदर्या, टीना, शालीन आणि अब्दू यांचा समावेश होता.
हि कॅटेगरी नॉमिनेट झाल्यास १० लाख रुपये परत येणार होते. तसेच लॉस्ट कॅटेगरीमध्ये निम्रित, सुंबुल, एमसी स्टॅन आणि श्रीजीता यांच्या नावाचा समावेश होता. हि कॅटेगरी नॉमिनेट केल्यास २० लाख रुपये परत येणार होते. त्यामुळे २० लाख रुपये परत आणण्यासाठी घरातील सर्व सदस्य आणि कुटुंबातील सदस्य यांनी लॉस्ट कॅटेगरीला नॉमिनेट केले.
Discussion about this post