Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

काय नागराजय, अरारारा..!; ‘झुंड’ पाहिल्यानंतर जितेंद्र जोशीने दिली अशी प्रतिक्रिया

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 7, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Jitendra Joshi on Jhund
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला आहे. यानंतर प्रेक्षक आणि समीक्षकांनी या चित्रपटाला हिरवा सिग्नल दिला आहे. दरम्यान अनेक बड्या कलाकारांनी आणि इंडस्ट्रीशी संबंधित लोकांनी झुंड या चित्रपटाचे विशेष कौतुक केले. यानंतर आता मराठी सिने इंडस्ट्रीतील अत्यंत लोकप्रिय नायक आणि रचनाकार जितेंद्र जोशी यानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडिया इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत आपले मत मांडले आहे. जाणून घ्या काय म्हणतोय जितू..,

 

View this post on Instagram

 

A post shared by jitendra joshi (@jitendrajoshi27)

जितेंद्र जोशी या व्हिडिओमध्ये बोलताना दिसतोय कि, “नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या चित्रपटाने आपल्याला आरसा दाखवला आहे. त्याच्या या चित्रपटासाठी एकच शब्द योग्य असेल ते म्हणजे.. जबरदस्त! चित्रपटाची भावना ही शेवटपर्यंत मनात कायम राहते. झुंडमध्ये फक्त उपदेशाचे डोस नाहीत तर हा चित्रपट तेवढाच एंटरटेनिंग पण आहे. नागराज आणि त्याच्या टीमने जबरदस्त काम केलंय. अनेक वर्षं मी असं काम पाहिलंच नाही. ही जी माझी मुलगी बसली आहे इथे आणि एखाद्या झोपडपट्टीतली मुलगी, यांच्यामध्ये काय फरक असेल? तिची आईसुद्धा तिला प्रेमाने खाऊपिऊ घालत असेल, ज्या पद्धतीने मी हिला करतो. मी कळकळीची विनंती करतो सगळ्यांना, कृपया आपल्या मुलांना हा सिनेमा दाखवा,” असं तो या व्हिडीओत म्हणतो.

View this post on Instagram

A post shared by Nagraj Popatrao Manjule (@nagraj_manjule)

याशिवाय नागराज मंजुळे यांनादेखील त्याने लाईव्ह मध्ये सहभागी करून घेतले होते. नागराज यांच्याबद्दल बोलताना जितेंद्र म्हणाला कि, “सगळ्यात गेट्रेस्ट गोष्ट काय नागराजची की, त्याच्या प्रत्येक कवितेत त्याचं जगणं आलंय पण ती कविता एक लाखनं गुणून त्यानं पडद्यावर आणली आणि त्यानं ती दाखवली कविता आणि मग ती कविता आपली होते. त्यानं फँड्री केला होता ना, तेव्हा अनेक लोकांना मागे लागून, बघा बघा फँड्री बघा. तर मला असं सांगितलं की, डुकराच्या मागे जाणाऱ्या माणसाची काय कथा असते व्हय. पण त्याचं जगणं आहे ना मग. म्हणजे तो जगलाय, तो जगत असताना तुम्ही ते जगणं त्याला दिलंत समाजाने. त्याच्या जगण्याविषयी तो आता भाष्य करतोय तर तेही तुम्हाला नाही चालत होय. बरं आणखी एक गोष्ट करायला लागला ना तो. त्याचा बिजनसही करायला लागला. बरं त्याचे पैसे असतात ना. सेट लावायला. अमिताभ बच्चन काय फुकट काम करत असन का? त्या सैराटनं एवढे पैसे मिळवून दिले इंडस्ट्रीला. मग सैराटनंतर काय नागराजय, अरारारा. नाही तो हे सगळे ठोकताळे बाजुला ठेवतो आणि सिनेमा बनवतो. झुंड पाहिल्यानंतर हीच बाब तुमच्याही नक्कीच लक्षात येईल.”

Tags: Instagram PostjhundJitendra Joshinagraj manjuleViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group