Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

इश्श्य..! ओळखा पाहू कोण? स्त्री वेशातील या अभिनेत्याला पाहून भल्याभल्यांची झाली दैना

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 16, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
Anshuman Vichare
0
SHARES
2
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आतापर्यंत बालगंधर्वांचा वारसा पुढे अजरामर करीत अनेक पुरुष कलाकारांनी स्त्री वेशातील भूमिका साकारल्या आहेत. नुसत्या साकारल्या नाहीत तर मनामनांवर आपल्या भूमिकांची छाप सोडली आहे. नुकताच एका अभिनेत्याने सुंदर अश्या स्त्री वेशभूषेतील फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. सुंदर आणि सालसरुपी स्त्री वेशातील हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून अभिनेता अंशुमन विचारे आहे. या फोटोत तो अगदी एखाद्या सौंदर्यवती रुपड्या महिलेसारखा दिसतोय. या वेशात तो इतका सुंदर दिसतोय कि त्याला ओळखणे अक्षरशः कठीण झाले आहे. आपल्या अभिनयाने जादू करणाऱ्या अंशुमनने स्त्री वेष साकारून प्रेक्षकांवर मोहाचे जाळच फेकले आहे.

View this post on Instagram

A post shared by Anshuman Vichare (@anshumanvichare)

अंशुमनने सोशल मीडिया फेसबुकवर स्त्री वेशातील फोटो शेअर करत लिहिले की, वेगळं काही करण्याची मज्जाच गंमत वेगळी असते. अंशुमनच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा भरभरून वर्षाव होतो आहे. खल्लास, छान दिसतो आहेस अशा कमेंट्स फोटोवर येत आहेत. इतकेच नव्हे तर काहींनी ‘नजर ना लग जाये’ म्हणत अंशुमनची प्रशंसा केली आहे. या फोटोत अंशुमन विचारे याने गुलाबी रंगाची काठापदराची मराठमोळी नऊ वारी साडी नेसली आहे. तसेच नाकात नथ, गळ्यात तनमणी ,केसाचा आंबाडा अशा स्त्री वेशात अंशुमन आपल्या सौंदर्याने नुसता भुलवितो आहे.

View this post on Instagram

A post shared by Anshuman Vichare (@anshumanvichare)

आपल्या विनोदाने सगळ्यांना हसवत ठेवणारा अंशुमन जेवढा लोकप्रिय आहे, तेवढीच लोकप्रिय त्याची मुलगी अन्वीसुद्धा आहे. सध्या त्याच्या मुलीचे अनेक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड पसंती मिळवीत आहेत. एकांकिकांमधून घडलेला अंशुमन आज नाटक आणि सिनेमा क्षेत्रात उत्तम स्थिरावला आहे. ‘श्वास’, ‘पोस्टर बॉईज’, ‘स्वराज्य’, ‘विठ्ठला शप्पथ’ अशा अनेक मराठी सिनेमांंमध्ये अंशुमन विचारेने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Anshuman Vichare (@anshumanvichare)

Tags: Anshuman VichareInstagram Postmarathi actorPoster BoysSinging StarVitthala Shapath
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group