हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । स्टारफर्राटा धावपटू दुती चंद हीने सांगितले की ती तिची लक्झरी कार आपल्या ट्रेनिंग साठी पैसे गोळा करण्यासाठी नाही तर ही कार मेंटेन करण्यामागचा खर्च खूप असल्याने विकत आहे. काही दिवसांपूर्वी दुती चंद हीने तिच्या ट्विटर अकॉउंटवरून आपली बीएमडब्ल्यू कार विकायची आहे असे ट्विट केले होते. यावरून तिला आर्थिक समस्या असल्याचे म्हंटले जात होते. यावर आता पुन्हा पोस्ट करून कार मेंटेन करण्याचा खर्च खूप असल्याने ती विकत असल्याचे स्पष्ट केले आहे.
माजी डेविस कप खेळाडू सोमदेव देववर्मनने दुतीचे समर्थन केले आहे. त्यांनी सांगितले की तिला केंद्रीय क्रीडा मंत्रालय, ओडिसा सरकार आणि भारतीय ऍथलेटिक्स महासंघ यांचेही तिला समर्थन मिळते आहे. दुती यांनी आपल्या ट्विटरवरून सांगितले आहे की, ‘मी माझी बीएमडब्ल्यू कार विकण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. माझ्याकडे लक्झरी कार ठेवण्यासाठी कोणतेच संसाधन नाही आहे. मला ही कार खूप आवडते, पण मी या कारचा वापर करू शकत नाही आहे. हा माझ्यासाठी बेकार खर्च आहे. मी कधीच म्हणाले नाही की मी माझ्या ट्रेनिंग चा खर्च करू शकत नाही आहे म्हणून ही कार विकते आहे.’
त्यांनी सांगितले, ओडिसा सरकार आणि केआयआयटी विद्यापीठ माझे समर्थन करत आहेत. आणि माझ्या ट्रेनिंगचा खर्च खूप आहे विशेषतः २०२१च्या ऑलिम्पिक चा या तथ्याला नाकारता येणार नाही. मला फक्त इतके सांगायचे होते की या पैशाचा वापर माझ्या ट्रेनिंग साठी केला जाऊ शकतो. आणि कोरोना विषाणूच्या महामारी नंतर राज्य सरकारकडून पैसे मिळाल्यावर कार खरेदी करता येईल. दुती यांनी ओडिसा खनन निगम (ओएमसी) मध्ये आपल्या मासिक वेतनाबद्दल सोशल मीडियावर येणाऱ्या बातम्यांचे खंडन केले आहे. ओएमसी मध्ये माझे मासिक वेतन ८०,००० नाही तर ६०,०००रु आहे. मी तक्रार करत नाही आहे. असेही त्यांनी सांगितले.