Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘या 30 एप्रिलला सलमान खानची हत्या करू’; बॉलिवूडच्या भाईजानला पुन्हा जीवघेणी धमकी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 11, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Salman Khan
0
SHARES
357
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा भाईजान अर्थात लोकप्रिय अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या ‘किसी का भाई किसी कि जान’ या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी सध्या सलमान ठिकठिकाणी जाताना दिसतो आहे. असे असताना भाईजानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. याआधी अगदी काहीच दिवसांपूर्वी सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकीचा मेल आला होता. यांनतर त्याच्या सुरक्षेत वाढ केली गेली. अशा सलग धमक्या आल्यानंतर सलमानने सुरक्षेखातर बुलेट प्रुफ एसयुव्ही गाडी देखील घेतली. पण यावेळी आलेल्या धमकीने मोठी खळबळ निर्माण केली आहे.

Salman Khan gets another death threat, Mumbai Police begins probe

Read @ANI Story | https://t.co/WH6GDgymw7#SalmanKhan #deaththreat pic.twitter.com/1yjLHQnj7U

— ANI Digital (@ani_digital) April 11, 2023

यावेळी सलमान खानला जीवे मारण्याची धमकी कुण्या रॉकी भाईकडून देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मुख्य म्हणजे यावेळी धमकी देताना तारीख सांगून जीवे मारणार असे सांगण्यात आले आहे. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी १० एप्रिल २०२३ रोजी मुंबई पोलिसांना रात्री ९:०० वाजण्याच्या सुमारास जोधपूरहून एक अज्ञात कॉल आला होता. याद्वारे ‘येत्या ३० एप्रिलला सलमान खानची हत्या करू’ अशी खुली धमकी देण्यात आली. धमकी देणाऱ्याने स्वत:ची ओळख रॉकी भाई अशी करुन दिली आणि एकच खळबळ उडाली. हा रॉकी भाई एक गौरक्षक असल्याचे बोलले जात आहे. सध्या याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. मात्र सलमानच्या चाहत्यांचा जीव धाकधूक करू लागला आहे.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला याआधीही अनेकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने तर मार्च महिन्यामध्ये एका माध्यमाला तुरुंगातून मुलाखत दिली होती आणि यादरम्यान त्याने सलमानला मारून टाकू असे म्हटले होते. त्यानंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून. भाईजानची वैयक्तिक सुरक्षा यंत्रणा देखील ऍक्टीव मोडमध्ये दिसते आहे.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

दरम्यान, सलमान खानचा आगामी सिनेमा ‘किसी का भाई किसी की जान’चा नुकताच ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला आहे. येत्या ईदच्या मुहुर्तावर म्हणजेच २१ एप्रिल २०२३ रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Tags: ANIbollywood actordeath threatInstagram PostSalman Khanviral postViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group