हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । बॉलीवूड ऍक्शन स्टार टायगर श्रॉफ सध्या खूप चर्चेत आहे. टायगर श्रॉफ आणि दिशा पटाणी यांच्या ब्रेकअपच्या बातम्याही समोर आल्या होत्या. त्यातच आता टायगरने याबाबत स्पष्टीकरण दिल आहे. मी सिंगल आहे, आम्ही फक्त मित्र आहोत असं तो म्हणाला.
अलीकडेच टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन कॉफी विथ करणमध्ये दिसले जिथे दोघांनी अनेक खुलासे केले. शो दरम्यान टायगरने सांगितले की तो सिंगल आहे. तर टायगर श्रॉफच्या आईला दिशा पटानीचे फोटो आवडतात असेही सांगायला तो विसरला नाही. आम्ही खूप दिवसांपासून हेच सांगत आहोत कि आम्ही चांगले मित्र आहोत आणि आजही हेच माझं मत आहे असं टायगर श्रॉफने म्हंटल. जेव्हा करणने त्याला शेवटचे विचारले की तो आता सिंगल आहे का? तेव्हा टायगरने उत्तर दिले, ‘हो, मला असे वाटते.
रिपोर्ट्सनुसार, टायगर आणि दिशाने काही दिवसांपूर्वी 6 वर्षांचे नाते तोडले होते. दोघांनी कधीही त्यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केले नसले तरी ते अनेकदा सुट्टी, डिनर डेट आणि आउटिंगला एकत्र जाताना दिसले. जवळपास सहा वर्षे डेटिंग केल्यानंतर या दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. या बातमीवर टायगर आणि दिशाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही किंवा ब्रेकअपचे कारणही स्पष्ट झालेले नाही.
Discussion about this post