हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस १६ चं घर गेल्या काही दिवसांपासून प्रेमाने बहरताना दिसत आहे. काही जोड्या हळूहळू तयार होत आहेत. त्यांच्यातील जवळीक हा शो आणखी इंटरेस्टिंग बनवतो आहे. ज्यामध्ये गौतम विग आणि सौंदर्या शर्मा यांच्यासह शालीन भनोत आणि टिना दत्ता यांच्या जोडीचा समावेश आहे.
पण कालच्या भागात शालीन आणि टिनामध्ये सुंबुलवरून असं काही भांडण झाली कि दोघेही एकमेकांपासून दुरावले आहेत. प्रेक्षक या जोडीला पसंती देतंच होते इतक्यात हि जोडी आता तुटण्याच्या मार्गावर आहे असे दिसत आहे.
बिग बॉस १६च्या घरात काल जोरदार हंगामा झाला. ज्याची सुरुवात निम्रत आणि प्रियंकामधील वादाने झाली. हा वाद भांडी धुण्यावरून सुरू झाला. यानंतर किचनमध्ये अर्चनाने बटाट्यांवरून तमाशा केला. सध्या शिव ठाकरेच्या हातात बिग बॉसच्या घराची सूत्रे आहेत त्यामुळे सगळेच कॅप्टन तू बघ तू बघ करत आहेत. या दरम्यान राशन साठी एक टास्क आला. ज्यामध्ये स्पर्धक एकमेकांवर तुटून पडले. दरम्यान मधूनच शालीन, गौतम आणि टिना यांच्यात भांडण सुरु झाली. ज्याचं कारण होती सुंबुल.
बिग बॉसच्या घरात शालिन आणि टीनाची लव्ह स्टोरी सुरू होतंच होती इतक्यात त्यांच्यात दुरावा आला आणि तोही सुंबुलमूळे. एका प्रोमोमध्ये शालिन टीनाला म्हणतो की, तू माझे हृदय तोडले आहे. यावर टीना तोच आरोप शालिनवर करते. एका टास्कमुळे शालिन आणि टीनाच्या प्रेममय नात्यात मोठा दुरावा आला आहे.
शालिनसोबत झालेल्या भांडणानंतर टीना अगदी भावनिक होऊन ढसाढसा रडायला लागते. यादरम्यान सुंबुल बेडरूममध्ये येते. पण सुंबुल आल्यावर दोघेही शांत बसतात. या भांडणात शालिन- टीना दुरावल्याचे दुःख सगळ्यांना आहे फक्त सुंबुलला नाही हे तिच्या आनंदी चेहऱ्यावरून दिसते. यामुळे घरातील सदस्य निम्रतने सुंबुलवर काही गंभीर आरोप लावताना दिसते.
Discussion about this post