हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या सोमवारी १९ सप्टेंबर २०२२ रोजी झी मराठी या लोकप्रिय वाहिनीवर एक नवी कोरी मालिका सुरु झाली आहे. जिचं नाव ‘दार उघड बये’ असे आहे. या मालिकेच्या सुरु होण्याआधी याचे शीर्षक गीत सोशल मीडियाच्या माध्यामातून प्रदर्शित करण्यात आले होते. दरम्यान मालिका सुरु होऊन अगदी आठवडादेखील पूर्ण झालेला नाही तोवर मालिकेच्या कथानकाने आणि विशेष म्हणजे शीर्षक गीताने प्रेक्षक वर्ग आपल्याकडे ओढला आहे. येत्या २ दिवसावर मंगलमयी सण आदिमायेच्या ९ रूपांची उपासना करावयाचे नवरात्रीचे शुभ दिवस सुरु होणार आहेत. यातच ‘दार उघड बये’ मालिकेच्या शीर्षक गीताने सोशल मीडिया गाजवायला सुरुवात केली आहे.
शारदीय नवरात्र उत्सवाचे दिवस अत्यंत पवित्र आणि आई भवानीचा भूतलावरील वास जाणवून देणारे असतात. या दिवसात आईच्या ९ रूपांची मनोभावे भक्ती, आराधना आणि पूजा केली जाते. या दिवसांमध्ये नारी शक्तीच्या विविध रूपांचा सन्मान केला जातो. त्यामुळे हे ९ दिवस अत्यंत उल्हास आणि आनंद निर्माण करणारे असतात. झी मराठीची ‘दार उघड बये’ हि मालिका नारी शक्तीच्या अशाच एका रूपाशी संबंधित आहे. त्यामुळे मालिकेचे शीर्षक गीत देखील तसेच आकर्षक आणि लक्ष वेधणारे आहे. या शीर्षक गीताचे बोल काहीसे असे आहेत कि,
हे वरी कोरडं आभाळ
गळा जोखळ्याची माळ
माझ्या रक्तात संबळ
गं आई
चालताना गं पाय मोडं, पाय मोड
आई मी लढणार बाळ… आई मी लढणार बाळ…
हे जनमनात महिषासुर
त्याचा करण्या गं संहार
केला प्राणांचा कापूर
जळू दे जुनाट सत्वर
उभी रणात हि नार
दार उघड बये दार… आई दार उघड बये दार
आई दार उघड.. आई दार उघड
मालिकेबद्दल विशेष सांगायचं झालं तर, या मालिकेचे कथानक स्त्री आणि पुरुष अशा भेदभावाला छेद देणारे आहे. मालिकेतील मुक्ता हे मुख्य पात्र अभिनेत्री सान्या चौधरी साकारत आहे. तर रावसाहेब या खलनायकाच्या भूमिकेत अभिनेता शरद पोंक्षे दिसत आहेत. हा लढा आहे नारी शक्तीचा. त्यामुळे या मालिकेला अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले आहे.
Discussion about this post