हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ एकेकाळी टीआरपीच्या रेसमध्ये सगळ्यात अव्वल होती. पण गेल्या काही काळात मालिकेतील मुख्य पात्रांनी मालिकेला रामराम ठोकला आणि मालिकेचा टीआरपी सर्र्कन खाली सरकला. इतकेच नव्हे तर या कलाकारांनी आतापर्यंत अनेकदा मालिकेचा निर्माते असित मोदीवर गंभीर आरोप लावले आहेत. यात आता मालिकेत रोशन सिंग सोढीच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीनेदेखील निर्मात्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. अभिनेत्रीने असित कुमार मोदी, प्रोजेक्ट हेड सोहल रमानी आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर जतिन बजाज यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
ई- टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ‘अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने गेल्या २ महिन्यांपासून शूटिंग थांबवलं होतं. ती शेवटची ७ मार्चला शूटिंगसाठी सेटवर पोहोचली होती. यावेळी सोहेल आणि जतिन बजाज यांनी अभिनेत्रीचा अपमान केला होता. त्यानंतर ती सेटवरून निघून गेली होती. याबाबत बोलताना अभिनेत्रीने सांगितले कि, ‘होळीच्या सणादिवशी ७ मार्च रोजी माझी अॅनिव्हर्सरी होती. त्याचदिवशी ही घटना झाली. मी सुट्टीसाठी अनेकदा विचारणा केली. पण मला ते जाऊच देत नव्हते. सोहेलनं माझ्या गाडीला जबरदस्तीनं थांबवलं. मी त्यांना म्हटलं देखील की मी १५ वर्ष या शोमध्ये काम केलं आहे. ते माझ्यासोबत असं करू शकत नाहीत’.
पुढे, ‘मी आधीच टीमला सांगितलं होतं की माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि मी हाफ डे घेऊन घरी जाणार आहे. माझी मुलगी देखील होळी सेलिब्रेशनसाठी माझी वाट पाहत आहे. पण निर्मात्यांनी मला घरी जाऊ दिलं नाही. मी असं देखील म्हटलं की २ तासाचा ब्रेक घेऊन मी परत शूटवर येईन. पण त्यांनी ऐकलं नाही. ते नेहमी मेल अॅक्टर्सला सगळ्याबाबतीत अॅडजस्ट करतात. या शोमध्ये पुरुषप्रधान संस्कृती अनेकदा दिसून येते. जतिननं माझी कार थांबवण्याचा प्रयत्न केला. हे सगळं सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे. मला वाटलं हे लोक मला कॉल करतील. पण २४ मार्च रोजी सोहेलनं मला नोटीस पाठवली की मी मालिका सोडली होती म्हणून ते माझे पैसे कापत आहेत. त्याने मला धमकी दिली’.
जेनिफरने पुढे सांगितलं, ‘४ एप्रिलला मी त्यांना व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून उत्तर दिलं की माझं लैंगिक शोषण झालं आहे. मी एक ड्राफ्ट पाठवला आणि त्याचं उत्तर देत त्यांनी म्हटलं कि मी त्यांच्याविरोधात हे सगळं पैशासाठी करतेय. त्याचदिवशी मी निर्णय घेतला की आता यांनी माझी सर्वांसमोर माफी मागावी. मी यासाठी वकीलाची मदत घेतली आहे आणि ८ एप्रिलला असित मोदी, सोहेल रमानी आणि जतिन बजाजला नोटीस पाठवली. मला यावर अद्याप काहीही उत्तर मिळालेलं नाही. पण मला विश्वास आहे की आता माझे वकील यात पूर्ण लक्ष घालतील आणि प्रकरणाचा योग्य तपास कायद्याच्या मदतीनं करतील’.
Discussion about this post