हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज दिनांक २३ सप्टेंबर २०२२ असून जगभरात आजचा हा दिवस राष्ट्रीय चित्रपट दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने ३००/- ते १०००/- रुपयांना असणारे सिनेमाचे तिकीट फक्त आणि फक्त ७५ रुपये असणार आहे. त्यामुळे आजचा शुक्रवारी अत्यंत खास आहे. यामुळे ३०० ते १००० रुपयांचे तिकीट काढून चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना अवघ्या ७५ रुपयांमध्ये चित्रपट पाहता येणार आहे. मुख्य म्हणजे केवळ ॲमॅझॉन आणि फ्लिपकार्टवरच नाही तर सिनेमागृहात हा बंपर सेल सुरु आहे. त्यामूळे आता प्रेक्षकांनी मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट स्वस्त दरात पाहण्याची हि संधी चुकवू नये असं आम्हालाही वाटत.
Here's a gentle reminder for India's first ever "National Cinema Day!"
Experience the biggest blockbusters at just ₹75 this Friday, at all our partnered cinemas across India. Let's celebrate the magic of movies on 23rd September, 2022.#NationalCinemaDay2022 #September23— Multiplex Association Of India (@MAofIndia) September 20, 2022
कोरोनानंतर चित्रपट सृष्टी डगमगत हळूहळू पूर्वपथावर येते आहे. त्यातच बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंडमुळे मोठमोठ्या अभिनेत्यांचे चित्रपटही फ्लॉप झाले आहेत. यानंतर ‘ब्रह्मास्त्र’ने बॉक्स ऑफिस चांगळेच गाजवले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे दोनशे कोटींचा व्यवसाय केला आहे.
यानंतर चालू आठवड्यात म्हणजेच आज २३ सप्टेंबर २०२२ रोजी ‘धोका’ आणि ‘चूप’ हे २ चित्रपट प्रदर्शित होत आहेत. मात्र, आज राष्ट्रीय चित्रपट दिन असल्यामुळे प्रेक्षकांना भेटवस्तू म्हणून चित्रपटांच्या तिकिटांची किंमत केवळ ७५ रुपये ठेवण्यात आली आहे. याचा परिणाम कदाचित या चित्रपटांच्या कमाईवर होऊ शकतो.
मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त एक ट्विट केले आहे. यामध्ये लिहिले आहे कि, ‘भारताच्या पहिल्या राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त भारतभरातील सर्व सहयोगी सिनेमागृहांमध्ये फक्त ७५ रुपयांमध्ये चित्रपटांचा आनंद घ्या.’ यामुळे आज २३ सप्टेंबर रोजी देशातील ४,००० चित्रपटगृहांमध्ये कोणताही चित्रपट फक्त आणि फक्त ७५ रुपयांमध्ये पाहता येणार आहे.
यापूर्वी १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा करणार होते मात्र ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट हिट झाल्यानंतर चित्रपटगृह मालकांनी नुकसान भरून काढण्यासाठी थोडा वेळ मागितल्यामुळे आजचा दिवस साजरा करण्याचे योजिले गेले.
Discussion about this post