Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

दिल.. दोस्ती.. दुनियादारी; ‘या’ आहेत मराठी सिनेसृष्टीतील हटके Best Friends’च्या जोड्या

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 7, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
0
SHARES
3
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज दिनांक ७ ऑगस्ट २०२२ आणि आजचा रविवार हा ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार आहे. म्हणजेच आजच्या युथ कॅल्क्युलेशननुसार आजचा रविवार हा फ्रेंडशिप डे आहे. म्हणूनच आजच्या या खास दिवसाचे औचित्य साधून आपण मराठी सिनेसृष्टीतील त्या हटके, बोल्ड, बिंधास्त सेलिब्रिटींविषयी जाणून घेणार आहोत जे एव्हढ्या स्पर्धेतही एकमेकांशी प्रामाणिक आहेत. मुख्य म्हणजे कितीही स्पर्धा करावी लागली तरीही ते एकमेकांचं कौतुक करतात पण ईर्षा आणि द्वेष बाळगत नाहीत. यालाच तर मित्र म्हणतात.

आपल्या सिनेइंडस्ट्रीमध्ये अशा अनेक जोड्या आहेत. यांपैकी काही मित्र मित्र आहेत. तर काही मैत्रीण मैत्रीण. अगदी मित्र आणि मैत्रीण अशाही या जोड्या आहेत. या दोस्त मंडळींनी तर समाजाच्या सगळ्या नियमांना छेद दिला आहे आणि हीच यांच्या मैत्रीतली दिलं. दोस्ती दुनियादारी आहे. चला तर जाणून घेऊया मराठी सिने इंडस्ट्रीतील बेस्ट फ्रेंड्सच्या जोड्या.

 

१) सई ताम्हणकर आणि प्रिया बापट

View this post on Instagram

A post shared by Sai (@saietamhankar)

या दोघीही इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्री आहेत आणि या ‘दोघीं’ची खास मैत्री आहे. त्यांनी ‘वजनदार’, ‘आम्ही दोघी’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्या अनेकदा विविध ठिकाणी एन्जॉय करताना दिसल्या आहेत.

२) संजय जाधव आणि सई ताम्हणकर

View this post on Instagram

A post shared by Sai (@saietamhankar)

या दोघांचीही अतिशय भारी अशी मैत्री आहे. अनेकदा संजय दादाचा चित्रपट सई ताम्हणकरशिवाय पूर्णच होत नाही असेही म्हटले जायचे. पण अर्थात तसे कधीच नव्हते. ते दोघेही एकमेकांचे चांगले सवंगडी आहेत हे मात्र आहे.

 

३) ​स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडित

View this post on Instagram

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

 

यांचीही अतिशय छान अशी मैत्री आहे. या दोघांनीही ‘तू ही रे’ हा चित्रपट आणि ‘समांतर’ ही वेब सीरिज एकत्र गाजवली आहे. एकमेकांच्या प्रोजेक्टविषयी ते नेहमीच कौतुकाने बोलताना दिसतात.

 

४) मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी

View this post on Instagram

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

 

यांचीही अतिशय भारी अशी गट्टी आहे. त्यांची मैत्री आपण मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातून अनुभवली आहे. स्वप्निल आणि मुक्ता गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत आणि ते नेहमीच एकमेकांच्या कामाचा आदर करतात. त्यांची ‘राधा- घना’ हि जोडी भारी प्रसिद्ध आहे.

 

५) वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत

View this post on Instagram

A post shared by VAIBHAV TATWAWADI (@vaibhav.tatwawaadi)

 

वैभव आणि पूजा यांनी फार चित्रपट एकत्र केले नाहीत. मात्र मैत्री त्यांनी फार जपली आहे. खरंतर यांच्यासोबत आणखी एक नाव घ्यायचं म्हणजे भूषण प्रधान. हे एकप्रकारचं त्रिकुट आहे जे अनेकदा पाहायला मिळत. पण त्यातल्या त्यात वैभव आणि पूजाची गट्टी भारीच आहे.

 

६) ​सिद्धार्थ चांदेकर आणि हेमंत ढोमे

View this post on Instagram

A post shared by Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21)

 

सिद्धार्थ चांदेकर आणि हेमंत ढोमे हे अतरंगी मित्र जोड आहे. पुण्यात एका नाटकादरम्यान त्यांची ओळख झाली ही त्यांच्यातील मैत्री त्यांनी टिकवली. अनेकदा मजा मस्ती आणि धमाल करताना हे दिसतात.

 

७) मिताली मयेकर आणि जुईली जोगळेकर

View this post on Instagram

A post shared by Mitali Mayekar Chandekar 🌻 (@mitalimayekar)

 

तसे तर मिताली तिचा नवरा सिद्धार्थ चांदेकर आणि जुईली तिचा नवरा रोहित राऊत हे चौघेही मित्र आहेत आणि ते हि खुप चांगले. पण ते असत ना गर्ल्स टॉक. त्या बाबतीत जुईली आणि मिताली टॉप आहेत. त्यामुळे बेस्ट फ्रेंडच्या यादीत हि जोडी नसेल तर मजा नाही.

 

८) अमृता खानविलकर आणि सोनाली खरे

View this post on Instagram

A post shared by Sonnali K khare (@iamsonalikhare)

 

अमृता आणि सोनाली फिटनेसच्या बाबतीत कुणाचंच ऐकत नाहीत एकमेकींचं सोडून. त्यामुकले अमृता आणि सोनाली प्रचंड चांगल्या मैत्रिणी आहेत. एवढंच काय तर सोनालीच्या मुलीशीही अमृताचं छान जमतं.

 

९) क्रांती रेडकर आणि उर्मिला कोठारे

View this post on Instagram

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

 

क्रांती आणि उर्मिला यांची मैत्रीही फार जुनी आहे. त्या नेहमीच एकमेकींचे कौतुक करताना दिसतात. माहितीनुसार लवकरच दोघी ‘रेनबो’ सिनेमाच्या निमित्ताने एकत्र दिसणार आहेत.

 

१०) भरत जाधव आणि केदार शिंदे

View this post on Instagram

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

 

भरत अभिनेता आणि केदार दिग्दर्शक असूनही कसे काय मित्र..? असे अनेकांना वाटते. पण अनोखं असण्यातच खरी मजा आहे. त्याच काय आहे नाटक करण्यापासून ते शाहिरांचा वारसा जपण्यापर्यंत यांनी एकत्र बरंच काही पाहिलंय त्यामुळे हि मैत्रीची जोड कालही मजबूत होती आणि आजही आहे.

Tags: Friendship DayMarathi CelebritiesMarathi Cine industryViral Photosviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group