हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लग्न म्हणजे कसं घरभर लगीनघाई.. सनई चौघडे… झेंडूच्या फुलांच्या कलरफुल माळा… मोठा लग्न मंडप…दारात रांगोळ्या, भरजरी शालू, जरतारीच्या पैठण्या, दागिन्यांमध्ये सजलेली लाजरी नवरी आणि सोवळं नेसलेला तडफदार छातीचा नवरा… सोबत ढीगभर पाहुणे…मनभर आशीर्वाद… जेवणामध्ये श्रीखंड पुरी आणि मसाले भात.. बापरे! केव्हढा तो खटाटोप. पण लग्न आहे ना आणि लग्न तर एकदाच होतं.
म्हणूनच हा सगळा पसारा, फुल्ल ऑन धमाल आणि मस्ती घेऊन प्लॅनेट मराठी सज्ज आहे. आपली लाडकी सोनाली कुलकर्णी आणि जावई बापू कुणाल बेनोडेकर यांच्या लग्नाचा हा सोहळा तुमच्याशिवाय अधुरा आहे. म्हणूनच सोनालीने दिलंय खास आग्रहाचं आमंत्रण..! यायचं हा! कधी…? अहो येत्या ११ ऑगस्ट २०२२ रोजी फक्त आपल्या प्लॅनेट मराठी ओटीटीवर. लगेच कुठे चाललात. आधी ट्रेलर तर पहा..
मोजके नातेवाईक आणि मित्र परिवारासोबत सोनाली-कुणालचा लग्नसोहळा झाला पण याचे फोटो व्हिडीओ कुठेच शेअर केले गेले नाहीत. त्यामुळे आपल्या लाडक्या अभिनेत्रीचं लग्न कसं झालं..? याची खदखद राहिली होती. शिवाय चाहत्यांशिवाय सोनालीच्याही मनाला रुखरुख लागली होती ना.. म्हणूनच प्लॅनेट मराठी ओटीटीवर हा लग्न सोहळा तुमच्या उपस्थितीने पूर्ण व्हावा म्हणून प्रसारित होत आहे. तर चाहते हो.. सोनाली आणि कुणालच्या आयुष्यातील या अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार जरूर व्हा!
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी याविषयी बोलताना म्हणाली कि, ‘आपलं लग्न धुमधडाक्यात व्हावं, हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. माझंही होतं. परंतु कोरोना महामारीमुळे आम्ही रजिस्टर लग्न केलं. त्यामुळे आमच्या लग्नात माझ्या माहेरच्या- सासरच्या कोणालाच सहभागी होता आलं नाही. त्यामुळेच सर्व काही आलबेल झाल्यानंतर आम्ही आमच्या जवळच्या लोकांसोबत अगदी पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. त्यानंतर आधुनिक पद्धतीने रिसेप्शनही केलं.
खरंतर कलाकार हे नेहमीच आपल्या अनेक वैयक्तिक गोष्टी या खासगी ठेवतात. मात्र मला माझ्या आयुष्यातील आनंदाचा क्षण माझ्या चाहत्यांसोबत शेअर करायचा आहे. म्हणूनच मी या सोहळ्याचं प्रसारण करण्याचं ठरवलं आणि यासाठी प्लॅनेट मराठीसारखं उत्तम ओटीटी मला मिळालं. ज्यामुळे माझा लग्नसोहळा जगभरातील मराठी प्रेक्षक पाहू शकतील.’
तसेच या प्रोजेक्टविषयी बोलताना ‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख आणि संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणाले कि, ‘साता समुद्रापार लंडनसारख्या देशात सोनाली कुलकर्णी व कुणाल बेनोडेकर यांचं लग्न पार पडलं होतं. प्रत्येक चाहत्याला आपल्या आवडत्या कलाकाराच्या लग्नातील धमालमस्ती अनुभवायची असते. सोनालीचा चाहतावर्ग पाहता आम्ही तिचा संपूर्ण लग्नसोहळा ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर प्रसारित करण्याचा निर्णय घेतला. नुकतंच तिच्या या लग्न सोहळ्याचा ट्रेलर झळकला असून त्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. लवकरच चाहत्यांना ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर तिच्या लग्नाला उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे.’
Discussion about this post