हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अत्यंत लोकप्रिय पण तितकाच वादग्रस्त रिऍलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’. त्यात सध्या सुरु झालेले बिग बॉसचे नवे सीजन थोडे नाही थोडे जास्तच आगळे वेगळे आहे. कितीतरी नवे रंग ढंग घेऊन बिग बॉस एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस अवतरला आहे. यंदाचा ‘बिग बॉस ओटीटी’च्या रुपात आला असून केवळ ओटीटी टाइम पुरता शोचा होस्टही बदलला आहे. ‘बिग बॉस ओटीटी’ शोचे होस्टिंग सलमान खानऐवजी निर्माता करण जोहर करतोय. या शोची रूपरेखा तर बदललीच पण याचसोबत रोज नवेनवे बदल नव्याने समोर येत आहेत. आता जी बातमी तुम्ही वाचणार आहात ती वाचून तुम्हाला नेमकं काय रिऍक्ट करावं तेच समजणार नाही. कारण यावेळेस होस्ट बदलला तास बिग बॉसचा आवाज बदलला तर? सूत्रानुसार, ओटीटीच्या घरात बॉलिवूड जगतातील ग्लॅमर अर्थात ज्येष्ठ अभिनेत्री रेखा एंट्री करणार आहेत. मुख्य म्हणजे या शोमध्ये त्यांची एंट्री एका खास कारणासाठी होतेय.
पीपिंगमूनने दिलेल्या वृत्तानुसार, बिग बॉसच्या मेकर्सने अभिनेत्री रेखा यांवर एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. या शोमध्ये ‘ट्री ऑफ फॉर्च्यून’ नावाच्या एका नव्या फीचरसाठी रेखा व्हॉईस ओव्हर देणार आहेत. बिग बॉसच्या प्रेक्षकांना रेखाचा आवाज ऐकू येणार आहे. अगदी बिग बॉसचा येतो ना तसाच. या दरम्यान बिग बॉस ओटीटीचे केवळ ५ आठवडे शिल्लक आहेत. तेवढे संपले कि, सलमान खान पुन्हा एकदा बिग बॉस १५ ची सूत्र हातात घेताना दिसेल. अगदी तेव्हाच बिग बॉस १५च्या टेलिव्हिजन कास्टदरम्यान पहिल्याच दिवशी रेखा महत्त्वाची जबाबदारी साकारताना दिसतील.
https://www.instagram.com/p/CMn_du9BqUW/?utm_source=ig_web_copy_link
‘ट्री ऑफ फॉर्च्यून’च्या फॉर्मेटनुसार रेखा शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या बिग बॉस हाऊसच्या सर्व सदस्यांना सलमान खानसोबत भेट करून देणार आहेत. तसेच रेखा शोच्या टॉप सदस्यांसोबत प्लस आणि माइनस पॉईंट हायलाईट करणार आहेत आणि याशिवाय त्या प्रत्येक सदस्याचे वैशिष्ट्य सांगणार आहेत. या घरातील कोणताही सदस्य ‘बिग बॉस १५’च्या हाऊसमध्ये टॉप सदस्य कसे बनू शकतात? हे देखील सांगताना दिसणार आहेत. मिळालेल्या विशेष माहितीनुसार, रेखा यांनी अलीकडेच जुहूतील डबिंग स्टुडिओमध्ये यासाठी डबिंग स्टुडिओमध्ये व्हॉईस डबिंग केले आहे.
Discussion about this post