Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘तू चाल पुढं’ मालिकेतील अश्विनीच्या लेकीचं मोठ्या पडद्यावर पदार्पण; ‘झुळूक’ होऊन प्रेक्षकांना भावणार..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 30, 2022
in Hot News, Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Vaishnavi Kalyankar
0
SHARES
73
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विविध मालिकांमधून अवघ्या महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे वैष्णवी कल्याणकर. जी सध्या झी मराठीवरील ‘तू चाल पुढं’ या मालिकेतील मुख्य नायिका अश्विनीची मोठी लेक मयुरीची भूमिका साकारत आहे. प्रेक्षकवर्ग वैष्णवीला मयुरी म्हणून ओळखत असले तरी आता लवकरच तिची एक नवी ओळख होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Deepa Chaudhari (@deepaparabchaudhariofficial)

मालिकांमधून तर वैष्णवीने अल्पावधितच प्रेक्षकांना आपलेसे केलेच. यानंतर आता वैष्णवी मोठ्या पडद्याच्या माध्यमातून मराठी चित्रपटात पदार्पण करत आहे. विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित ‘बांबू’ या चित्रपटातून ती मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. नुकतीच तिची चित्रपटातील झलक सोशल मीडियावर झळकली आहे. सरळ, साधी, सालस असणारी ही ‘झुळूक’ तरुणांना भावणारी आहे.

View this post on Instagram

A post shared by Vaishnavi Kalyankar (@vaishnavi.kalyankar.96)

आपल्या चित्रपटातील पदार्पणाबद्दल वैष्णवी कल्याणकर म्हणते, ‘मोठ्या पडद्यावर मी पहिल्यांदाच झळकणार आहे. त्यामुळे आनंदी, उत्साही, थोडीशी धाकधूक अशा विविध भावना सध्या मी अनुभवतेय. यात मी ‘झुळूक’ची व्यक्तिरेखा साकारतेय, जी खूपच सोज्वळ, निरागस आहे. तरुणींना ही व्यक्तिरेखा आपल्या खूप जवळची वाटेल. जणू काही ही आपल्याच घरातली आहे, असे वाटेल. एका मालिकेदरम्यान मी ‘बांबू’मधील ‘झुळूक’साठी ऑडिशन दिले होते. माझी निवड झाली आणि प्रॉडक्शनकडून मला एकदा सकाळी सात वाजता पुण्याला बोलवले. आमची ही मीटिंग सुमारे पाच तास चालू होती. त्यानंतर मग पुढची प्रक्रिया सुरु झाली. आता लवकरच ‘झुळूक’ तुम्हाला भेटायला येणार आहे.’

View this post on Instagram

A post shared by Vaishnavi Kalyankar (@vaishnavi.kalyankar.96)

क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन निर्मित या चित्रपटाचे निर्माते तेजस्विनी पंडित, संतोष खेर आहेत. तर या चित्रपटाचे लेखन अंबर हडप यांनी केले आहे. अभिनय बेर्डे, शिवाजी साटम, अतुल काळे, वैष्णवी कल्याणकर, पार्थ भालेराव, स्नेहल शिदम, समीर चौघुले यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘बांबू’ येत्या २६ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags: BambuInstagram PostPoster ReleasedTu Chal Pudh FameVaishnavi Kalyankar
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group