Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘तू धगधगती आग’; अनन्या’च्या ध्येयवेड्या प्रवासाचे वर्णन करणारे गाणे प्रदर्शित

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 13, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Ananya
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सर्वत्र चर्चेत असलेल्या प्रताप फड दिग्दर्शित ‘अनन्या’ हा चित्रपट येत्या २२ जुलै २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याआधी नुकतेच या चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याचे शीर्षक ‘तू धगधगती आग’ असे आहे. हे एक स्फूर्तीदायी आणि जिद्दीचा प्रवास दर्शविणारे गाणे आहे. त्यामुळे या गाण्याला प्रेक्षकांना उदंड प्रतिसाद मिळतो आहे. या जबरदस्त गाण्याला बॅालिवूडचे लोकप्रिय गायक विशाल ददलानी यांनी आपला आवाज दिला आहे. या गाण्यातून अनन्या या पात्राचा संपूर्ण संघर्ष, जिद्द आणि प्रेरणा देणारा प्रवास दर्शविला आहे. हे गाणे सध्या सोशल मीडियासह अन्य प्लॅटफॉर्मवर आपली छाप सोडताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

या चित्रपटात ‘अनन्या’ची आव्हानात्मक भूमिका अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने साकारली आहे. पोस्टर, टिझर, ट्रेलर, रोमँटिक गाणे आणि त्यानंतर आता हे भावनिक तसेच प्रेरणादायी गाणे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहेत. ‘तू धगधगती आग’ या गाण्याचे बोल अभिषेक खणकर यांनी लिहिले आहेत. तर समीर साप्तीस्कर यांनी गाण्याला संगीत दिले आहे. या गाण्यातून आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंगावर ‘अनन्या’ने केलेली मात आणि जिद्दीने लढत समर्थपणे उभी राहिल्याचे प्रसंग रेखाटले आहेत. ‘शक्य आहे. तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे.’ या टॅगलाईनमधून या चित्रपटातील मुख्य गाभारा दर्शविण्यात आला आहे. हे संपूर्ण गाणे अत्यंत ऊर्जेने भरलेले आहे. एका प्रसंगात ‘अनन्या’चे दोन्ही हात ती गमावते आणि त्यानंतर तिला जो संघर्ष करावा लागतो त्याची एक झलक या गाण्यातून दिसतेय. अतिशय भावुक करणारे हे गाणे सोशल मीडियावर चर्चेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Ravi Jadhav (@ravijadhavofficial)

या गाण्याबद्दल बोलताना दिग्दर्शक प्रताप फड म्हणाले कि, ‘या गाण्याची खासियत म्हणजे ज्यांनी बॅालिवूडला एकापेक्षा एक सुपरहिट गाणी दिली अशा विशाल ददलानी यांनी हे गाणे गायले आहे. विशेष म्हणजे हे गाणे विशाल यांनी गाताना खूपच एन्जॉय केले. त्यामुळे त्यांचातील या सकारात्मक लहरी यात गाण्यात आपसूकच आल्या आहेत. हे गाणे अधिकच बळ देणारे बनले.’ याशिवाय निर्माता रवी जाधव म्हणाले कि, ‘हे गाणे अतिशय प्रेरणा देणारे असून या गाण्याची संगीत टीम अतिशय तगडी आहे. विशाल ददलानी यांनी आपल्या आवाजाने या गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे. यातील प्रत्येक गाणे काहीतरी सांगत आहे. त्यामुळे ही गाणी श्रोत्यांना अधिक भावतील.’

Tags: AnanyaHruta DurguleInstagram PostNew Song ReleaseRavi JadhavUpcoming Marathi MovieViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group