हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाल सगळेच सेलिब्रिटी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. याचे कारण म्हणजे सोशल मिडियाच्या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहू शकतात. अनेकदा हे सेलिब्रिटी एक वेगळाच लूक शेअर करून आपल्या चाहत्यांना सरप्राईज करताना दिसतात. असाच एक लूक टीव्हीवरील प्रसिद्ध संस्कारी बघून शेअर केला आहे. तिच्या चेहऱ्यावर पांढरी टोपी असल्यामुळे ती नक्की कोण आहे हे ओळखणे मुश्किल होत आहे. पण शेवटी चाहतेच ते… न ओळखून कसं काय चालेल..?
बऱ्याचदा कलाकार स्वतःचे असे फोटो शेअर करतात जे पाहून त्यांना ओळखणे कठीण असते. काही वेळा असे फोटो पॅपराझींच्या अकाउंवरून शेअर केले जातात. त्यामुळे चाहते अंदाज लावून ते कलाकार ओळखतात आणि यात त्यांनाही मजा येते. असाच एक फोटो अभिनेत्री रुबिना दिलैकने शेअर केला आहे. यात तिने बोल्ड शिमरी ब्रालेट आणि ऑफ व्हाइट लाँग पँट घातली आहे. तिने स्वतःचा चेहरा ऑफ व्हाइट टोपीने झाकला आहे. तिच्या हातात हटके डिझाइन असलेलं ब्रेसलेटदेखील आहे.
हा फोटो पाहून ‘ही अभिनेत्री नेमकी कोण आहे..?’ ते ओळखण्यास चाहत्यांना सांगितले आहे. काहींनी एका झटक्यात हि रुबी असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी वेगवेगळी विशेषण देत हा गेम आणखीच मजेशीर केला आहे. काहींनी तर रुबीनाला ‘बॉस लेडी’सुद्धा म्हटलंय. दरम्यान, रुबिना दिलैकने तिचे या पेहरावातील काही फोटो इंस्टाग्रामवरदेखील शेअर केले आहेत. जे कमल आहेत. सोबत ‘हॅलो ब्युटिफूल पिपल’ असं कॅप्शन तिने दिलंय. रुबिनाच्या या फोटोवर चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील तिच्या मित्र- मैत्रिणींनी हार्ट इमोजी शेअर केले आहेत.
 
	
					
		
		
		
    
    
     
			
 
                                     
            
Discussion about this post