हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । मनोरंजन विश्वात अनेक अभिनेत्री स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात. मात्र फिल्म इंडस्ट्रीत असेही काही लोक आहेत जे हा सगळा झगमगाट सोडण्याचा निर्णय घेतात. यातील काहीजण आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवणं पसंद करतात तर काही अध्यात्माच्या मार्गाला लागतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी काही दिवसांपूर्वीच भिक मागताना दिसून आली आहे.
प्रसिद्ध टीव्ही शॉ ‘अनुपमा’ ची अभिनेत्री अनघा भोसलेनेही वयाच्या 22 व्या वर्षी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा अनघाचा निर्णय एकूण लोकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यानंतर अनघाने आपल्याला करमणुकीच्या दुनियेची चकचकी सोडून देवाच्या भक्तीत लीन व्हायचे असल्याचं एका वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. पण केवळ अनघाच नाही तर आणखी एक अभिनेत्री आहे अशी आहे जिने फिल्म इंडस्ट्रीचा झगमगाट सोडून संन्यासी जीवन जगण्याचा निर्णय घेतला आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे नुपूर अलंकार.

भिक मागताना दिसून आली नुपूर 
सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री नुपूर अलंकार गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. तिच्या प्रसिद्धीच्या झोतात येण्याचे कारण तिचा आगामी प्रोजेक्ट नसून तिचे वैयक्तिक आयुष्य आहे. नुपूरने अभिनय जगताला कायमचा अलविदा करून अध्यात्माचा मार्ग निवडला आहे. ती संन्यासी झाली आहे. अशा परिस्थितीत नुपूरही या बैरागी जीवनाचा टप्पा पूर्ण समर्पणाने पूर्ण करत आहे. अलीकडे ती रस्त्यावर भीक मागताना दिसला.

नुपूरने असा निर्णय का घेतला?
माणसाने आयुष्यात भरपूर पैसे कमावले तरी त्याला मनशांती मिळतेच असं होत नाही. त्यामुळे अनेक श्रीमंत व्यक्ती वैयक्तिक आयुष्यात यशस्वी होऊनसुद्धा सर्व भौतिक सुखाचा त्याग करून साधे जीवन जगण्याचा निर्णय घेतात. याच प्रेरणेतून अभिनेत्री नुपूर अलंकारनेसुद्धा सन्यास घेत अध्यात्माचा मार्ग निवडला आहे.
	
					
		
		
		
    
    
    
			
                                    
            
Discussion about this post