हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या भीतीमुळे शाळा, महाविद्यालये आणि भारतातील अनेक बाजारपेठांमध्ये कुलूप लागले आहे. परंतु या सर्व ठिकाणांपैकी सर्वात जास्त प्रभावित स्थान म्हणजे फिल्म इंडस्ट्री. भारतात कोरोना विषाणूमुळे पीडित लोकांची संख्या १५७ वर गेली आहे आणि ३ लोकांच्या मृत्यूचीही पुष्टी झाली आहे. अशा परिस्थितीत, कोणत्याही प्रकारचा धोका घेणे ही या कोरोना विषाणूस बोलावणे आहे.
बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांच्या रिलीजच्या तारखादेखील पुढे ढकलण्यात आल्या असून बर्याच चित्रपटांचे शूटिंगही बंद करण्यात आले आहे. पण फक्त बॉलिवूडच नाही तर आता टीव्ही मालिकांचे शूटिंगही बंद करण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार भारत सरकारकडून कोणत्याही प्रकारचे शूटिंग १९ मार्च ते ३१ मार्च दरम्यान थांबविण्यात आले आहे.
प्रेक्षकांना शोचे कोणतेही नवीन भाग पहायला मिळणार नाहीत. तसेच त्यांना तेच जुने रिपीट टेलिकास्ट पहावे लागतील. काही टीव्ही सीरियल शूट बंद करण्यात आले आहेत.
निर्माता असित मोदी यांनी बनवलेल्या’तारक मेहता का उल्टा चश्मा’शोचे शूटिंग बीएमसीने (मुंबई महानगरपालिका) १७ मार्च रोजी थांबवले होते.
टीव्ही जगतातील सर्वाधिक काळ चालणार्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है’चे शूटिंग काही दिवसांपूर्वी थांबविण्यात आले होते. या कार्यक्रमाचे निर्माता राजन शाही म्हणाले की शोच्या क्रू मेंबर्सची सुरक्षा त्यांच्यासाठी अधिक महत्वपूर्ण आहे.
टीव्ही कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ चे शूटिंगही बीएमसीने थांबवले होते. बुधवारी एका एपिसोडचं चित्रीकरण होणार असलं तरी शूटिंग पुढे ढकलण्यात आलं.