Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘सबस्क्रिप्शन नाही..? ब्लू टिक नाही’; बड्या बड्या सेलिब्रिटींच्या ट्विटर हँडलचे व्हेरीफाईड बॅज गायब

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 21, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
75
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एलॉन मस्कने जाहीर केल्याप्रमाणे २० एप्रिल २०२३ पासून व्हेरीफाईड ट्विटर हॅण्डल्ससाठी सबस्क्रिप्शन न घेणाऱ्यांच्या ब्लु टिक काढून घेण्यात आल्या आहेत. ब्लू टिकसाठी युजर्सना पैसे द्यावे लागतील असे सांगूनही अनेक बड्या बड्या सेलिब्रिटी कलाकार, स्टार क्रिकेटर्सने सबस्क्रिप्शन न घेतल्याने त्यांच्याही हँडल्सचे ब्लु टीक काढून घेण्यात आले आहे. ब्लूट टिक गमावणाऱ्यांच्या यादीत बॉलिवूडच्या दिग्गज सेलिब्रिटींच्या नावाचा समावेश आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार यांसारख्या सुपरस्टार्सचंही इथे काहीच चाललं नाही. यांच्याही ट्विटर हॅण्डल्सचे ब्लू टिक हटवण्यात आले आहेत. ट्विटर ओनर एलॉन मस्कने काही महिन्यांपूर्वीच या गोष्टीची पूर्वसूचना दिली होती. सबस्क्रिप्शन न घेणार्‍यांच्या ब्लू टिक्स २० एप्रिस पासून काढून घेणार. त्यामुळे मासिक शुल्क भरूनच ब्लू टिकची सुविधा वापरता येईल. यात मोबाईल ट्विटरसाठी दरमहा ९०० रुपये तर वेब व्हर्जनसाठी ६५० रुपये भरावे लागणार आहेत.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे ट्विटरवर ४८.४ मिलियन फॉलोअर्स आहेत. तर बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचे ट्विटरवर ४३.४ मिलियन फॉलोअर्स आहेत. तसेच बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानचे ४५ मिलियन फॉलोअर्स आहेत. याशिवाय बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार ट्विटरवर फार सक्रिय नसला तरी त्याचे ४५.७ मिलियन फॉलोअर्स आहेत. इतके फॉलोवर्स असूनही आज त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल ट्विटरची ब्लू टिक काढून घेण्यात आली आहे. ब्लु टिक गमावणाऱ्यांमध्ये विजय, रजनीकांत, क्रिकेटपटू विराट कोहली, क्रिकेटर रोहित शर्मा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महेंद्रसिंग धोनी यांचा समावेश आहे.

Tags: akshay kumarAmitabh BachchanElon MuskRajanikanthSalman KhanShahrukh KhanTwitter Rules
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group