हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे ही तिच्या आगळ्या वेगळ्या भूमिका आणि दर्जेदार अभिनयासाठी ओळखली जाते. यामुळे तिचा असा एक स्वतंत्र प्रेक्षक वर्ग आहे. अल्पावधीतच तिने खूप मोठा चाहता वर्ग मिळवला आहे. सध्या सर्वत्र मुक्ताच्या ‘वाय’ या आगामी चित्रपटाची चर्चा आहे. अलीकडेच याचा टिझर रिलीज झाला आणि प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच वादळी. दिग्दर्शक अजित सुर्यकांत वाडीकर दिग्दर्शित ‘वाय’ या चित्रपटाचा हा टीझर पाहून कुणाला यातील गूढ जाणून घेण्याची इच्छा होणार नाही.. म्हणूनच ‘वाय’चे पोस्टर हातात धरून अनेक मान्यवरांनी या चित्रपटाला पाठिंबा दिला होता. यानंतर आता ‘Y’ या चित्रपटाला एका सामाजिक संस्थेने अगदी आगळ्यावेगळ्या स्वरूपात शुभेच्छा दिल्या आहेत.
या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेत्री मुक्ता बर्वे दिसतेय. यामुळे सध्या प्रमोशनसाठी ती विविध ठिकाणी जात असते. दरम्यान तिने ‘स्नेहालय’, ‘स्नेहांकूर’ आणि ‘युवान’ अशा लहान मुलांशी संबंधित सामाजिक संस्थांना पूर्ण भावनेने भेट दिली आहे. यावेळी मुक्ताने तेथील लहान लहान मुलांसोबत काही आनंदाचे क्षण घालवले. त्यांच्यासोबत मज्जा केली, गप्पा मारल्या आणि खूप खेळ सुद्धा खेळले. दरम्यान तिने त्यांच्यासोबत काही किस्सेदेखील शेअर केले. या संस्थेकडूनही तिला एक अनोखी भेट देण्यात आली आहे. हि भेट म्हणजे तिच्या २४ जून २०२२ रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘वाय’ या चित्रपटाचे अक्षर मुलांच्या साहाय्याने बनवून त्यांनी या चित्रपटाला अनोख्या अशा शुभेच्छा दिल्या आहेत. मुक्ताने त्यांची ही भेट खूप आनंदाने स्वीकारली आणि काही क्षणासाठी ती भावुकदेखील झाल्याचे दिसली.
कंट्रोल एन प्रॅाडक्शन निर्मित ‘Y’ या चित्रपटाची पटकथा आणि संवाद दिग्दर्शक अजित वाडीकर यांचेच आहेत. सामाजिक संस्थांना दिलेल्या भेटीनंतर अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती म्हणाली कि, ‘’हा अनुभव माझ्यासाठी खूप काही देणारा, शिकवणारा होता. या मुलांना भेटून मन भरून आलं आणि तितकीच त्यांच्याकडून प्रेरणाही मिळाली. रक्ताची नाती नसतानाही ही मुलं इथे इतकी मिळून मिसळून राहतात, याचं विशेष कौतुक वाटलं. या लहानग्यांसोबत घालवलेला क्षण खूप मौल्यवान असून या सर्वांनी ‘वाय’ला दिलेल्या शुभेच्छाही माझ्यासाठी खास आहेत.’’
Discussion about this post