हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अतरंगी आणि डोक्यावरून जाणारी फॅशन संपूर्ण इंडस्ट्रीत एक तर रणवीर सिंग करतो नाहीतर उर्फी जावेद. काहीच समजलं नाही तर रणवीर काहीच घालत नाही.. पण उर्फी अतरंगी कपडे तयार करून डोक्याला ताप देण्यासाठी प्रसिद्ध आहे. ज्यामुळे कितीतरी वेळा ती वारंवार ट्रोल झाली आहे. पण सुधारायचं नाव काढेल ती उर्फी कुठली. अलीकडेच तिचं एक नवंकोरं गाणं आलं आहे. जे रेट्रो सॉंगचा रिमेक आहे. ‘हाय हाय ये मजबुरी’ असे या गाण्याचे नाव आहे. याच्या शूटिंगदरम्यान उर्फी नाचताना झोपाळ्यावरून पडली होती. साहजिकच पडली तर काळजीने लोकांनी तिच्याबद्दल विचारायला हवे. पण काळजी सोडा नेटकरी यावरूनसुद्धा तिला ट्रोल करत आहेत.
उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे सारखी वादात अडकते. त्यामुळे तिच्याबद्दल काही बोलायचं असेल तर लोक आधी तिच्या फॅशनवर बोलतात. तिच्या ’हाय हाय ये मजबुरी’ या गाण्याला मात्र सर्वांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसले. या गाण्याने आठवड्याभरातच ७ मिलिअनचा टप्पा पार केलाय.
दरम्यान सोशल मीडियावर तिच्या या गाण्याच्या शूटिंगवेळचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ तिने स्वतःच शेअर केला आहे. ज्यामध्ये उर्फी झोपाळ्यावर नाचतांना दिसत आहे. इतक्यात अचानक ती घसरून खाली पडते. पण तिच्यासोबत नाचणाऱ्या कलाकारांनी तिला लगेच पकडल्यामुळे तिला दुखापत होत नाही. हा व्हिडीओ शेअर करत तिने हा प्रसंग खरंच हाय हाय म्हणण्यासारखा होता असे कॅप्शन दिले आहे.
या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. तिच्या या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. कुणी काळजीने विचारपुस करतंय. तर कुणी तिची टर उडवतंय. एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘गिरी हुई औरत’. तर अन्य एकाने लिहिले आहे कि, ‘बिचारीला कपड्यांचं वजन झेपलं नाही’. इतकंच नव्हे तर आणखी एकाने लिहिले कि, यार काय करायचं या बाईचं’. तर अन्य एकाने लिहिले कि, ‘खूप वर उडत होती ना. म्हणून देवाने खाली पाडलं.’ याशिवाय आणखी एकाने लिहिले कि, ‘असंच झालं पाहिजॆ हिच्यासोबत.’
Discussion about this post