हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियावर सतत विचित्र पेहराव करून फोटो आणि व्हिडीओ शेअर करणारी उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्फी जावेद सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते आणि यावर ती नेहमीच चित्र विचित्र कपड्यातील लूक शेअर करत असते. अनेकदा ट्रोल होऊनही उर्फी स्वतःचा हट्ट सोडायला तयार नाही. उलट ती आणखीच खालच्या पातळीला उतरू लागली आहे. थोडे जास्त कपडे घाल म्हटलं कि उर्फी घालत असलेल्या कपड्यातलं कापड कमी करते. याहीवेळी तिने ट्रोलर्सला डिवचण्याचं परफेक्ट काम केलं आहे.
उर्फी जावेदने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर तिचा नवा लूक शेअर केला आहे. यामध्ये तिने काय परिधान केलंय हेच सांगणं मुश्किल झालंय. गुलाबी केस आणि जीन्सचा काही भलताच अवतार करत तिने हा नवा लूक शेअर केला आहे. उर्फीने ऑपन बटन मिडी परिधान केला आहे. तर टॉप म्हणून तिने फक्त हात झाकण्यासाठी उलट्या जीन्सचा वापर केला आहे. सोबत हार्ट आणि स्टारचे स्टिकर लावून तिने छाती झाकली आहे. तिचा हा लूक पाहून ट्रोलर्सही कितीदा ट्रोल करायचं..? या प्रश्नात पडले असतील.
पण यावेळी काय बोलणार..? असे म्हणत नेटकऱ्यांनी उर्फीला हात जोडले आहेत. अनेक मुस्लिम महिलांनी कमेंट करत ‘उर्फी धर्मावर कलंक असल्याचे म्हटले आहे’. तर एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘एव्हढं झाकण्याचे तरी का कष्ट घेतेस..?’ तसेच आणखी एकाने म्हटले आहे, ‘तुझ्यासारख्या लोकांमुळे लवकरच इंस्टाग्राम बंद होईल असं वाटू लागलं आहे’. आणखी एकाने म्हटले आहे, ‘किती बेशरम आहेस तू.. ट्रोल होतेस तरी पुन्हा तेच करतेस’. अन्य एकाने लिहिले कि,’ एव्हढी ट्रोलिंग होऊनही हिची बेशरमी वाढतच चालली आहे’. तसेच आणखी एकाने कमेंट्समध्ये लिहिलंय कि, ‘हिने तर अश्लीलतेचा कळस गाठलाय.. निर्लज्ज बाई’.
Discussion about this post