हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। उर्फी जावेद.. आजकाल नुसतं हे नाव काढलं तरीही सोशल मीडिया हादरतो. उर्फीच्या अतरंगी लाइफस्टाइल, फॅशन आणि ड्रेसिंग आयडियामुळे नेटकरी आधीच बेजार झाले आहेत. त्यात रोज उर्फी काहीतरी नवे वाद शोधून काढते. कधी भांडते, कधी टीका करते तर कधी आगाऊपणा करते. ज्यामुळे उर्फीच्या फॅशनसोबत तिचा विचित्र स्वभावदेखील चांगलाच चर्चेचा विषय ठरतो. उर्फीचे जितके ट्रोलर्स आहेत त्याहून जास्त फॉलोवर्स आहेत. त्यामुळे उर्फी दिसली कि सेल्फीसाठी धावणारे खूप आहेत. असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे पण उर्फी जे बोलली ते ऐकून सगळेच थक्क झाले.
उर्फी अनेकदा विविध कार्यक्रमामध्ये सहभागी होताना दिसत असते. त्यामुळे ती एखाद्या ठिकाणी स्पॉट झाली तर चाहत्यांची मोठी गर्दी दिसते. आताही एका कार्यक्रमामध्ये उर्फी आली असताना तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी चाहत्यांनी तिच्याभोवती गराडा घातला. यावेळी उर्फी भडकली. आपल्या विचित्र फॅशनसाठी उर्फी सोशल मीडियावर ओळखली जाते. बऱ्याच दिवसांपासून उर्फी ही सोशल मीडियावर नेटकऱ्यांची नाराजी ओढावून घेताना दिसत आहे. असे असताना चाहत्यांवर संताप व्यक्त करणे उर्फीला महागात पडू शकते. यावेळी तिने चाहत्यांकडे अशी काही मागणी केली आहे कि पुढे काय बोलायचं तेच सुचेना.
उर्फीसोबत सेल्फी घेण्यासाठी चाहते जवळ येताच उर्फीने त्यांच्याकडे पैश्यांची मागणी केली आहे. होय. ज्यांना माझ्यासोबत सेल्फी घ्यायचा आहे त्यांनी पैसे द्या. पैसे द्या आणि माझ्यासोबत सेल्फी घ्या. असे उर्फीने म्हटले. तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून यावर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. इतकेच नव्हे तर अनेक नेटकऱ्यांनी तिच्या कपड्यावरून तिची खिल्ली उडवली आहे. एकाने म्हटले आहे, ‘तू आजारी आहेस का..? पूर्ण कपडे कसे घातलेस..?’ तर आणखी एकाने म्हटले, ‘तुझ्यासोबत सेल्फी घेतात.? आश्चर्य आहे’. तर आणखी एकाने म्हटले, ‘घाईघाईत सलवार घालायला विसरलीस ना’.
Discussion about this post