हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अतरंगी फॅशन, वादग्रस्त वक्तव्ये यामुळे उर्फी जावेद नेहमीच चर्चेत राहिली आहे. कधी काचेचे तुकडे, कधी सुतळी, कधी गोट्या तरी कधी काय अशी तिची डोक्यावरून जाणारी फॅशन. बिग बॉस हिंदीच्या ओटीटी सिजनमुळे उर्फी प्रकाशझोतात आली आणि आता सोशल मीडिया गाजवताना दिसते. अनेकदा तिच्या फॅशनमुळे ती ट्रोलही होते. पण थांबेल ती उर्फी थोडीच. यावेळी मात्र उर्फीने मोठी मजल मारली आहे. उर्फीने थेट बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारवर निशाणा साधला आहे. त्याच्या नुकत्याच फ्लॉप झालेल्या रक्षाबंधन चित्रपटाच्या कथानकावर उर्फीने आक्षेप घेतला आहे.
एका मुलाखतीत बोलताना उर्फी जावेद म्हणाली कि, ‘रक्षाबंधनचे ट्रेलर मी पाहिले. मला वाटले हा चित्रपट ३० वर्षानंतर का प्रदर्शित होत आहे. ती तर ९० व्या दशकात प्रदर्शित व्हायला हवा होता. हा हुंडा काय असतो. बहिणीचे लग्न करायचे आहे. हुंड्याची जमवाजमव करायचे आहे. मला माफ करा. पण हा चित्रपट ३० वर्षांपूर्वीचा आहे. आज आपल्याला अशा चित्रपटाची गरज नाही तर अशा चित्रपटाची गरज आहे जिथे मुलीने म्हणायला हवे, भावा ऐक तू तुझ काम कर, मी माझे काम करते. माझ्या लग्नाची चिंता करण्याची गरज नाही. मी आपले काम करेल, पैसा कमवेल, खाण-पिण करेल. रक्षाबंधनमधील त्या बहिणींनी हे बोलायला हवे होते. त्यामुळे मला तर वाटतं कि हा चित्रपट का प्रदर्शित झाला..?’
दिनांक ११ ऑगस्ट २०२२ रोजी ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट रिलीज झाला आणि बॉक्स ऑफिसवर चांगलाच पडला. त्यामुळे अक्षय कुमार अभिनेता अक्षय कुमारच्या कारकिर्दीत गेल्या काही काळापासून मोठमोठे अडथळे येत आहेत. बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज आणि आता रक्षाबंधन. तसं पहायला गेलं तर अक्षयने आपल्या कारकिर्दीतील फ्लॉप चित्रपटांची हॅट्रिक केली आहे असे म्हणायला हरकत नाही. खूप प्रमोशन करूनही अक्षयचे सिनेमे फ्लॉप होताना दिसत आहेत. त्यामुळे बॉयकॉट बॉलिवूडचा दणका खिलाडीला जोरदार बसला आहे असेच म्हणावे लागेल.
Discussion about this post