हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या चित्र विचित्र अतरंगी फॅशन सेन्समुळॆ उर्फी जावेद सोशल मीडियावर वारंवार चर्चेत असते. अनेकदा तिच्या अशा ड्रेसिंगमुळे नेटकरी तिच्यावर अगदी खालच्या पातळीला उतरून टीका करताना दिसतात. रमजान महिन्यात स्वतः मुस्लिम असूनही तिने विचित्र कपडे परिधान केल्यामुळे तिच्यावर नेटकरी आणि इस्लामिक धर्मीय लोक नाराज झाले होते. पण तरीही उर्फी तिच्या अंदाजात मस्त बिनधास्त वावरताना दिसते आहे. अशातच तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती गरजू लोकांना ५०० रुपयांच्या नोटा वाटताना दिसते आहे.
उर्फी जावेद कितीही ट्रोल होत असली तरीही तिची फॅनफॉलोईंग जबरदस्त मोठी आहे. अनेकदा उर्फी मुंबईच्या रस्त्यांवर तिने परिधान केलेल्या युनिक ड्रेसिंगमध्येही बिनधास्तपणे वावरताना दिसते. इतकच काय तर फोटोग्राफर्सना पोज देते आणि त्यांच्याशी संवादही साधते. असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये उर्फी मुंबईतील बांद्रा येथील एका महागड्या हॉटेलमधून जेवून बाहेर पडत होती. यावेळी तिने लोकरीची शॉर्ट्स आणि क्रॉप टॉप परिधान केला होता. यावर तिने गुलाबी ब्लेझरही घातला होता. हॉटेलातून उर्फी बाहेर पडताना तिच्याकडे लहान गरजू मुलाने पैशाची मागणी केली आणि तिने चक्क त्याला ५०० रुपयाची नोट दिली.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये उर्फी हॉटेलमधून बाहेर येताना दिसते आहे. यानंतर फोटोग्राफर्सना पोज देऊन झाल्यावर ती गाडीत बसण्यासाठी पुढे होताना एक छोटा गरजू मुलगा तिच्याकडे पैशांची मागणी करतो. यावेळी उर्फीने हू का चू न करता लगेच पाकिटातून ५०० रुपये काढून त्याला दिले. यानंतर आणखी एका गरजू व्यक्तीने तिच्याकडे पैसे मागितले असता उर्फीने त्यालाही ५०० रुपयाची नोट दिली. तिने त्या व्यक्तीला नोट देताच पुन्हा एकदा तो लहान मुलगा तिच्याकडे आला आणि आणखी पैसे मागू लागला. पण त्या वेळी मात्र उर्फीने त्याला हसऱ्या चेहऱ्याने नकार देत तिथून जायला सांगितलं. यावर एकाने नेटकऱ्याने म्हटले कि, ‘हा पब्लिसिटी स्टंट आहेत’. तर आणखी एकाने म्हटले, ‘हि करते काय एव्हढं… ज्यातून इतकी कमाई करते’
Discussion about this post