हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एक असतात सांगून समजणारे आणि एक असतात ट्रोल होऊन समजणारे. पण उर्फी जावेद मात्र यांच्यापेक्षा फार वेगळी आहे. कारण तिला सांगून, बोलून किंवा ट्रोल करूनही ती इतर कुणाच्या नव्हे तर स्वतःच्याच मनासारखं करते. अनेकवेळा सोशल मीडियावर उर्फी ट्रोल होताना दिसली आहे. याचे कारण म्हणजे तिची अतरंगी फॅशन. अनेकदा फॅशनच्या नावावर ती कहर करताना दिसते. डोक्याच्या बाहेरची फॅशन करण्यात उर्फी पटाईत आहे. याहीवेळी तिने अशीच काही फॅशन केली आहे. ज्यात तिने शर्ट पुढून तर घातलंय पण मागून नाही.
फॅशन जगतात आयकॉनिक लूक करूनही ट्रोल होणारं कुणी असेल तर ती उर्फी जावेद आहे. कारण चित्र विचित्र फॅशन करणे आणि मग सोशल मीडियावर फोटो तसेच व्हिडीओ शेअर करणे हा तिचा छंद आहे. यामुळे ती सारखी ट्रोल होताना दिसत आहे. आजही ती याच कारणामुळे ट्रोल होतेय. यावेळी उर्फीने शेअर केलेला लूक बोल्डनेसच्याही मर्यादा ओलांडतोय. यामध्ये उर्फीने फुल स्लीव्ह निळ्या रंगाचा शाईन शर्ट परिधान केला असल्याचे दिसत आहे. पण आश्चर्य हे आहे कि, तिने हे शर्ट फक्त समोरच्या बाजूने परिधान केले आहे. कमरेभोवती ताराच्या साहाय्याने तिने हे शर्ट बांधले आहे. या शर्टसोबत तिने बॅकलेस लूक केला आहे. ज्यामुळे तीची पाठ पूर्णपणे उघडी आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना उर्फीने यासोबत भन्नाट कॅप्शनही लिहिले आहे. यामध्ये उर्फीने लिहिले आहे कि, ‘तुम्हाला शर्ट घालण्यासाठी शर्ट घालण्याची गरज नाही!’ म्हणजेच, तो घालण्यासाठी तुम्हाला शर्ट घालण्याची गरज नाही. उर्फीच्या या लूकने सोशल मीडिया युजर्सचं डोकं पुन्हा एकदा फिरवलं आहे. हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये समजेलच. यातील बऱ्याच कमेंट अर्वाच्य भाषेतील आहेत. पण कमालीची बाब हि आहे कि, तिचे चाहते कोणत्याही परिस्थितीत तीच कौतुक करण्यावाचून थांबत नाहीत.

Discussion about this post