हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। उर्फी जावेदचं आणि वादाचं एक वेगळंच नातं आहे. कपड्यांचं मोजमाप न करता बिनधास्त आणि मुक्त संचार करणे हा उर्फीचा छंद आहे. उर्फी ही तिच्या कामापेक्षा जास्त तिच्या फॅशन आणि वादामुळेच जास्त चर्चेत असते. अलीकडेच उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वादामुळे ती जरा जास्त चर्चेत आली होती. यानंतर आता उर्फीचा आणखी एक नवा अंदाज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नुसता व्हायरल झालेला नाही तर पुन्हा एकदा तिच्या फॅशन सेंन्समुळे ट्रोल झाला आहे.
सार्वजनिक ठिकाणी अर्धवट कपडे घालण्याचा आरोप करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीवर टिका केली होती. मात्र उर्फीही काही कमी नाही हे काही वेगळं सांगायला नको. या वादात तिनेही चित्रा वाघ यांचा चांगलाच फडशा पाडला. तिने कधी हिरवा पालेभाज्या तर कधी फळे अंगावर ठेऊन फोटो तसेच व्हिडीओ शूट केले. आता ती एका नव्या अवतारात दिसली आहे. उर्फीचा हा अवतार पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला तर नवीन नाही. कारण उर्फीने यावेळी पायात जीन्स घालण्यापेक्षा अंगात घालणे जास्त सोयीचे समजले.
तिचा हा अतरंगी लूक पाहून आणखी कायचं बोलणार.. याला कसली फॅशन म्हणायचं ते तिलाच ठाऊक. पण काही असो तिचा लूक जगासाठी विचित्र असला तरी तिच्यासाठी भारी असतो. त्यामुळे जेव्हा जीन्समधील अवतारात उर्फी मीडियासमोर आली तेव्हा मीडियातील एका प्रतिनिधीने तिला विचारले कि, ‘उर्फीजी… येह क्या पेहना है..?’. यावर तिने म्हटले कि, ‘माझा ड्रेस खराब झाला होता आणि घालण्यासाठीही काही नव्हते म्हणून मी हि जीन्स घातली. आता उर्फीच्या या उत्तराच नवल वाटायला नकॊ. बिंधास्त जगणे आणि वावरणे याबाबतीत उर्फीची बरोबरी अवघडंच.
Discussion about this post