हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या विचित्र आणि आक्षेपार्ह फॅशनमुळे कितीही अडचणी आल्या, ट्रोलिंग झालं तरीही न सुधारणारी व्यक्ती म्हणजे उर्फी जावेद. वारंवार ट्रोल होऊनही तिने आपण बेशरम आहोत असे खुले म्हणत आपली फॅशन टिकवली आहे. कापड सोडून वाट्टेल ते अंगाला गुंडाळून कॅमेरासमोर उभी राहणारी उर्फी आता ट्रान्सपरंट बिकिनीत दिसली आहे. या पेहरावातील व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आणि अगदी काही मिनिटांतच हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसला आहे.
चित्र विचित्र फॅशन करणारी उर्फी कधी अर्ध नग्न अवस्थेत येऊन कॅमेरासमोर उभी राहते तर कधी मोडक्या तोडक्या वस्तू अंगाला चिकटवून. यावेळी ट्रान्सपरंट बिकिनीत तिने विचित्र हावभाव करत आणि आपले हाथ छातीवर ठेवून एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो पाहून नेटकऱ्यांनी तिला खोचक पद्धतीने ट्रोल केले आहे. भले उर्फीने तिचा फॅशन सेन्स बदलला नसेल पण ट्रोलर्सने मात्र ट्रोलिंग करण्याची पद्धत बदलली आहे. काहींनी अगदी सडकून टीका केल्या आहेत. तर काहींनी अतिशय हुशारीने टोमणे हाणले आहेत.
नेटकऱ्यांनी उर्फीचा हा अवतार पाहून तिच्यावर टीकांचा अगदी पाऊस पाडला आहे. तर एका नेटकऱ्याने म्हटले आहे, ‘हे चांगले आहे.. पण आता व्हायरल होत नाही.. एक काम कर तू आता पॉ* व्हिडीओ बनवं.. म्हजणजे व्हायरल होशील’. तर आणखी एकाने म्हटले आहे, ‘एव्हढं करून भागलं नाही तर हात काढून टाक.. आता आम्हाला सवय झाली आहे’. इतकेच काय तर काही नेटकऱ्यांनी अगदी मर्यादा ओलांडून शब्द प्रयोग करीत उर्फीच्या अब्रूचे वाभाडे काढले आहेत. अशाप्रकारे उर्फी पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे.
Discussion about this post