हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियावर आपल्या अतरंगी स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत राहणारी उर्फी जावेद सतत ट्रोल होऊनही सुधारायचं काही नाव घेत नाही. अर्धेमुर्धे कपडे आणि सतत वादावादी यामुळे उर्फी जावेद सोशल मीडियावर गॉसिपिंगचा विषय ठरताना दिसते. नुकतेच तिने सोशल मीडियावर एक नवी पोस्ट शेअर करत एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. यावेळी नुसतं ट्रोल नाही तर अनेकांनी वेगवेगळे सल्ले सुद्धा देऊ केले आहेत.
उर्फी जावेदने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये उर्फीने कार्गो पॅन्ट परिधान केली आहे आणि त्यासोबत छातीवर एक्स रे चा फोटो अन त्यावर तुटलेल्या हृदयाचा ईमोजी दिसतो आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी उर्फीला या फोटोवरून पुन्हा ट्रोल केलं आहे. तर अनेकांनी उर्फीच्या बिंधास्त अंदाजाला पसंती दिली आहे.
या फोटोवर कमेंट करताना एका नेटकऱ्याने म्हटले आहे, ‘अरे तू तर डोक्याचा पण एक्स रे करून घे.. तुला गरज आहे’. तर आणखी एकाने म्हटले आहे, ‘अजूनही वेळ आहे.. सुधर.. नाहीतर तुझं काही खरं नाही’. तसेच आणखी एकाने म्हटले आहे, ‘बाई तुला लाज नाही हे आम्हाला माहितेय.. पण आम्हाला तर लाज आहे.. रोज अशा पोस्ट करून ट्रेंड होणं बंद कर’. अन्य एकाने म्हटले, ‘तू दिवसागणिक आणखीच — होत चालली आहेस’. तर आणखी एकाने म्हटले आहे, ‘तुझा एक्स रे पाहून मला माझा एक्स रे काढायची वेळ आली आहे असे वाटते आहे’.
Discussion about this post