Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हॅपी बर्थडे आऊ! उषा ताईंचा नाद सगळयात डेंजर; पहा Video

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 13, 2022
in बातम्या, महाराष्ट्र, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Usha Nadkarni
0
SHARES
28
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन | मराठी तसेच हिंदी चित्रपट, नाटक इतकेच काय तर विविध मालिकांमध्ये, एकापेक्षा एक सरस भूमिका बजावणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी या प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांसाठी लोकप्रिय अभिनेत्री आहेत. आज दिनांक १३ सप्टेंबर असून आज आऊंचा म्हणजेच उषा ताईंचा वाढदिवस आहे. आज आऊ आपला ७६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. दिनांक १३ सप्टेंबर १९४६ रोजी त्यांचा जन्म झाला होता. यानंतर आज २०२२ सालात त्या स्वतःची अशी एक वेगळी ओळख असल्यामुळे प्रसिद्ध आहेत. गेली अनेक दशकं त्या मनोरंजन क्षेत्रात अविरत कार्यरत आहेत. त्यांची संवाद करण्याची अनोखी लकब, सडेतोड स्वभाव, परखड व्यक्तिमत्व सगळं कसं परफेक्ट आहे. अलीकडेच झी मराठीच्या बस बाई बस या कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. दरम्यान त्यांनी काही भन्नाट किस्से प्रेक्षकांसह शेअर केले होते. याचे प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

सुबोध भावेच्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमामध्ये उषा नाडकर्णी सहभागी झाल्या आणि कार्यक्रमाला चार चाँद लागले. कारण नेहमीप्रमाणे सुबोध प्रश्न विचारत होता आणि आऊ सडेतोड उत्तर देत होत्या. सोशल मीडियावर या विशेष भागाचे काही व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यापैकी एकात आऊंच्या धमकीचा डेंजर ईफेक्टचा किस्सा चांगलाच व्हायरल झालाय. आऊंना प्रश्न विचारण्यात आला की, ताई तुम्ही बँकेत काम करत होता. मग एखाद्या निर्मात्याने तुम्हाला पैसे दिले नसतील तर तुम्ही चांगले वसूल केले असतील? यावर उत्तर देताना आऊ म्हणाल्या की, मी कितीतरी वेळा म्हणाले आहे की, जो माझे राहिलेले पैसे जर कुणी गोळा करून देईन तर त्याला मी १०% किंवा २०% देईन. कारण जितके चांगले लोक आहेत पैसे देण्यात तितके पैसे चोरण्यात लबाड लोक आहेत.

पुढे म्हणाल्या, मी तुम्हाला सांगते.. एक सिरियल होती मी काहीतरी एक १० एपिसोड वगैरे करून ती सोडली. त्याच सगळ पाहून एकंदर मला कळलं की याच काही खरं नाही. मी म्हंटल, मैं ऑस्करमे जाएगी तोह मुझे आने मे टाईम नहीं हैं.. तोह मैं छोड रही हू| सिरियल सोडली आणि एक पैसा सुध्दा मिळाला नव्हता. आता तुम्ही मला सांगा मी चूक का बरोबर. कितींदा फोन केला पैशासाठी. एकदा काय झालं मॅनेजरचा जो नंबर दिला होता तो फिरवल्यानंतर ही घेते, ती घेते, ती घेते.. अरे रोजच कसा तो नाही आणि एक दिवस गंमत झाली त्यानेच उचलला. मी म्हटल मेरा पैसा देनेवाले हो के नहीं. एक तिकडे खाली वाईनचं दुकान आहे. मी म्हटल उसके उपर आके मै आपकी…… खोलुंगी और पैसा लेके जाऊंगी… तिसऱ्या दिवशी घरामध्ये चेक आला. हा प्रसंग ऐकून सगळेच हसू लागले. पण पुन्हा एकदा आउंच्या धडाकेबाज स्वभावाचा प्रत्यय आला. बस बाई बस या कार्यक्रमात आऊंची गाजलेली ही मुलाखत सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होते आहे.

Tags: Marathi ActressTV ShowUdha Nadkarni
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group