हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना स्क्रीन्स न मिळणे हा केवळ विषय राहिला नसून आता हा मुद्दा झाला आहे. ज्यावर भाष्य करणे अत्यंत गरजेचे आहे. आज महाराष्ट्रात अनेक चित्रपटगृहे आहेत जिथे सिनेमे लागतात. पण मराठी चित्रपट अगदी २ ते ३ दिवसांतच स्क्रीनवरून उतरवले जातात. अशीच घटना हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’ चित्रपटाबाबत घडली. ज्यामुळे मराठी सिने कलाकार आणि प्रेक्षक मंडळी संतापले आहेत. अशातच अभिनेता उत्कर्ष शिंदेनेही या गोष्टीचा निषेध नोंदवित एल्गार पुकारला आहे.
अभिनेता उत्कर्ष शिंदेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने सनी चित्रपट आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेचा फोटो शेअर केला आहे. ज्यावर लिहिलंय कि, ‘तिकिटं काढल्यानंतर पैसे परत देऊन ‘सनी’ चित्रपटाचा शो रद्द!! सोबतच त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘आज मराठी सिनेमाला बर्बरतेतून समृद्धीच्या वाटेवर आणायच असेल तर, समानतेची वागणूक मिळायलाच हवी. अद्वितीय महान कलाकार दादा कोंडके ह्यांच्या चित्रपटांना त्या काळी चित्रपटगृह मिळाली न्हवती. बहुदा मुद्दाम गळचेपीच मराठी चित्रपटाची करायचा मनसुबा काहींचा तेव्हा होता. तोच प्रश्न, तीच वेळ, तेच विचार, तीच कुचंबणा, तीच डावलण्याची मानसिकता आज हि तोंड वर काढतीये.’
पुढे लिहिलंय, ‘मराठी चित्रपट बनवताना किती कष्टाने सर्व जण आपलं सर्व काही झोकून देत उत्तम चित्रपट तयार करायचा प्रयत्न करतायेत. पण अंततः प्रदर्शनास हक्काचे चित्रपटगृह, मुबलक वेळ, स्क्रीन्स… का महाराष्ट्रातच मराठी चित्रपटांना दिली जात नाहीये..? ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ ह्या ओळी फक्त बोलण्या पुरत्या नसाव्यात, किमान एकमेकांसाठी उभे राहूया. एकमेकांचा आवाज बनूया, सोबतीने संघटित होत आपले हक्क मिळवूया!’ गेल्या काही काळापासून मराठी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस येत असल्याचे पाहून मराठी सिनेसृष्टीला खाली दाबण्यासाठी हे कृत्य केले जात असल्याचे अनेक प्रेक्षकांनी म्हटले आहे. यावर आता कोण आणि काय भूमिका घेणार पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Discussion about this post