हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्राण्याला माणसापेक्षा जास्त लवकर माया कळते आणि माणसाला प्राण्याच्या प्रेमाची अधिक ओढ लागते हे म्हणतात ते खोटे नाही. आपल्यापैकी अनेक लोक आवड म्हणून विविध प्राणी पाळतात. हि आवड सवय आणि नंतर गरज कधी होऊन जाते कळतंच नाही. एक अनामिक आणि अतूट नाते तयार झाल्यानंतर हे प्राणी अचानक आयुष्यातून दूर निघून जातात आणि तेव्हा जो त्रास होतो तो शब्दांतही व्यक्त करता येत नाही. हा त्रास आणि हे दुःख गायक उत्कर्ष शिंदेच्या वाट्याला आलंय. उत्कर्षने नुकताच त्याच्या १३ वर्षीय लाडक्या मित्राला अर्थात ‘जिंगल’ला अखेरचा निरोप दिला आहे. बुधवारी रात्री जिंगलचे निधन झाले आणि असह्य वेदना उष्कर्षला स्पर्शून गेल्या. जिवाहून प्यारा.. दोस्त जिंगलच्या आठवणीत उत्कर्षने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ज्यावर त्याच्या चाहत्यांनी कमेंट करीत जिंगलच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये उत्कर्षने जिंगलसोबतचे विविध फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंसह उत्कर्षने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘गौरव महाराष्ट्राचा सिंगिंग रिऍलिटी शोच माझ्या आयुष्यातल पाहिलं संगीतकार म्हणून मी केलेल “जिंगल” टायटल सॉंग आणि त्याच दरम्यान आयुष्यात चाळीस दिवसाचा तूला आणला आणि नाव ठेवलं “जिंगल” छोटासाच पण मजेशीर.. तुझी जन्मतारीख २ डिसेंबर जी आपल्या आल्हादची हि जन्मतारीख. डॅडचा तर सर्वात लाडाचा म्हणजे तूच. पुणे पिंपरी माझ्या डॉक्टरकीच्या काळात डि वाय पाटील मेडिकल कॉलेजमध्ये माझ्या सोबत कित्येकदा कॅन्टीनमध्ये लपून छपून बॅगेत सेमिनारमध्ये, मित्रांसोबत तू हि मज्जा केलीस. माझ्या बरोबर एंटायसरवर बसून फिरणारा तू. सर्वांचाच लाडका. पटकन ऑर्डर शिकणारा स्मार्ट पग. माझ्या सोबत अजून हि प्रवास करणारा. शिंदेशाहीचा अविभाज्य भाग झालास. तुझ्या नंतर jyazz neomastiff आली. पण तिला प्रोटेक्ट करणारा तूच. मग आता “ट्यून”साठी पोजेस्सीव तूच. जिंगल म्हटलं कि सर्वांनी लाड करायचा.’
‘काल तू रात्री गेलास आणि सर्वांचे कॉल सुरु झाले. कोणत्या माणसाने इतकी माणसे जोडली नसतील इतकी माणसे तू जोडलीस. तुझ्या जाण्यानी तुझे बेस्ट डॉक्टर गोरे सर हि रडले. १३ वर्ष तुला काही नाही झालं आणि आता तू असा घाई घाईत निघून गेलास काल माझ्या समोर. माझ्या प्रयत्नांना यश नाही आलं. आल्हाद, आलाप, अंतरा सर्वांना काय उत्तर देऊ..? त्यांचा जिंगल कुठे गेला..? काय सांगू..? कालपासून त्यांचे कॉल घेण्याची ताकत नाहीये रे. डॅडचा कॉल आला आणि ते ढसा ढसा रडत होते तुझ्यासाठी मी त्यांना सावरलं पण तू त्यांचा किती लाडका होता हे जगजाहीर आहे. आणि हो पण डॅड नेहमी आल्यावर तुझा होणारे एक्सट्रा लाड. मग तुझं बॉसचा बॉस आल्यासारखं तोऱ्यात वागणं. ⓐⓒ, गादी ब्लॅंकेट सर्व टॉप पाहिजे असायचं तुला. मी दमून आलो कि माझ्या डोक्याकडे येऊन बसणं.मी जेवताना तू डायनींगकडे माझ्या पायाखालीच बसणं. मी ‘बिग बॉसमध्ये असताना tvवर मला बघणं.. सर्वांचे व्हिडीओ पाहिले कि तू किती हुशार होतास हे जाणवतं. तुझं ते टीशर्ट, टाय, बो, स्कार्फ, तुझ्या नावाची गोल्ड चैन, तू केलेलं निस्वार्थी प्रेम- माया- आपुलकी सर्व तुझी आठवण करून देत राहतील. जिंगल…. आय मिस यु..’ उत्कर्षचे प्राणीप्रेमी आपण अनेकदा पाहत असतो. पण स्वतःच्या डोळ्यासमोर रोज थोडा थोडा मोठा झालेला जिंगल अचानक जाण्याने उत्कर्ष अत्यंत दुःखी झाला आहे.
Discussion about this post