हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक घराणे म्हणजे शिंदे घराणे. या शिंदेशाहीतील एक महत्वाची व्यक्ती म्हणजे उत्कर्ष शिंदे. बिग बॉस मराठीतून त्याची आणि प्रेक्षकांची भेट झाली. यांनतर तो थेट मनामनांत पोहोचला. उत्कर्ष पेशाने डॉक्टर असूनही गायन, लेखन, संगीत दिग्दर्शन अशा विविध क्षेत्रात तो कार्यरत आहे. उत्कर्ष स्वतः एक उत्तम व्यक्ती आहेच जाणीव तो सामाजिक जाणही ठेवतो. सोशल मीडियावरील त्याच्या पोस्ट चांगल्याच व्हायरल होत असतात. यानंतर आता तो संत चोखामेळा महाराजांच्या भूमिकेतून ‘सोनी मराठी’ वरील ‘ज्ञानेश्वर माऊली’ या मालिकेत झळकणार आहे.
ज्येष्ठ गायक प्रल्हाद शिंदे यांचा नातू आणि आनंद शिंदे यांचा मुलगा उत्कर्ष शिंदे शिंदेशाही कुटुंबाची गायनाची परंपरा समर्थपणे पेलत आहेच. याशिवाय तो आपले इतर छंदही जोपासतो आहे. सध्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘ज्ञानेश्वर माउली’ या मालिकेत प्रेक्षकांना संतांची परंपरा दाखवली जात आहे. ज्ञानेश्वर माउली आणि त्यांची भावंडं यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, श्रीसार्थ ज्ञानेश्वरी, विश्वरूप दर्शन, पसायदान हे सार काही आतापर्यंत प्रेक्षकांच्या हृदयाला भावलं आहे. अलौकिक हरिभक्तीच्या या प्रवासाचे आपण साक्षीदार झालो आणि यानंतर आता मालिकेत संत चोखामेळा यांच्या भक्तिरसात न्हाहून निघायला प्रेक्षकहो सज्ज व्हा.
संत कान्होपात्रा यांच्या येण्याने या संतांच्या प्रवासाची सुरुवात झाली. पुढे माउलींचे चमत्कार आणि भक्तीत प्रेक्षक मंडळी रंगली. यानंतर आता संत चोखामेळा यांच्या प्रवासात प्रेक्षक तल्लीन होणार आहेत. या पात्राच्या भूमिकेत उत्कर्ष शिंदे अभिनेता म्हणून स्वतःला सिद्धकरणार आहे. पतितांना तारणारे व उपेक्षितांची र्कैफियत देवापुढे तळमळीने मांडणारे संत अशी संत चोखामेळा यांची ख्याती आहे. या भूमिकेतून उत्कर्षला पाहणे त्याच्या चाहत्यांसाठी मोठी बाब आहे. अंगावर गोंघडीचे वस्त्र, हातात काठी अशा दैवी अवतारात उत्कर्ष दिसणार आहे.
Discussion about this post