हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आपल्या आगामी ऐतिहासिक चित्रपटाची जंगी घोषणा केली. या चित्रपटाचे नाव ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ (Vedat Marathe Veer Daudle Saat) असे असून या चित्रपटातील मुख्य भूमिकांचे चेहरे त्यांनी सर्वांसमोर आणले. या चित्रपटात शिंदेशाहीचा एक अविभाज्य भाग असणारा उत्कर्ष शिंदे हा ७ मावळ्यांपैकी एक अशा ‘सूर्याजी दांडकर’ यांची भूमिका साकारतोय. उत्कर्ष शिंदे हा पेशाने डॉक्टर आहे. तर शिंदेंचं घराणं लाभल्यामुळे त्याच्या रक्तातच संगीत आहे. यामुळे तो एक उत्तम गायक देखील आहे.
आपण त्याला बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात पाहिले होते. जिथे त्याची ओळख एक एंटरटेनर म्हणून झाली. शिवाय तो एका मालिकेत उत्तम भूमिका साकारतो आहेच आणि आता मोठ्या पडद्यावर ऐतिहासिक चित्रपटातून सिनेसृष्टीत जोरदार पदार्पण करतोय. असा हा उत्कर्ष इतका व्हर्सटाईल झाला आहे कि, अगदी त्याच्या नावाप्रमाणे दिवसेंदिवस प्रगती करताना दिसतो आहे. म्हणूनच हॅलो बॉलिवूडने मल्टी टॅलेंटेड डॉक्टर, सिंगर, ऍक्टर, एंटरटेनर उत्कर्ष शिंदेसोबत बातचीत केली.
यावेळी उत्कर्षने त्याला मोठ्या पडद्यावर थेट ऐतिहासिक भूमिका साकारायला मिळाली याबाबत आपला आनंद शब्दातून व्यक्त केला आहे. तो म्हणाला कि, ‘जेव्हा ७ माणसं हजारों माणसांमध्ये घुसली तेव्हा कुणालाही माहित नव्हतं कि कोणाला कसं मारायचं. हातात एक तलवार, ढाल आणि घोडा एव्हढ्याच तयारीने ती थेट शिरली. हि काही मारामारी नाहीये. हा मॅडनेस आहे. त्यामुळे हा मॅडनेस तुम्ही अंगीकारत नाही तोपर्यंत तुम्ही ती भूमिका सकारूच शकणार नाही. जेव्हा मला कळलं कि मी सूर्याजी दांडकर हि भूमिका साकारणार आहे, तेव्हा मी खूप आनंदी झालो. एकतर मांजरेकरांचा चित्रपट आणि लहानपणापासून ऐकत आलेली ती गोष्ट ते गाणं ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हे आता स्वतः अनुभवतोय.’
यानंतर भूमिका साकारताना त्याचा अभ्यास काय आणि कसा करतोयस विचारले असता तो म्हणाला, ‘आपण जेव्हा त्यातील एक मावळा असतो तेव्हा त्याचा खरा अर्थ त्या घटनेमागील खरी आत्मीयता आणि त्या भावनेचा स्पर्श जाणवतो. यामुळे आता हि भूमिका साकारताना तुमचं दिसणं, उठणं, बसणं, बोलणं, पेहराव या सगळ्यातच बदल करत आहे. तुमची भूमिका तुमच्या शारीरिक हालचालीमध्ये दिसेल याचा अभ्यास सुरु आहे. दिवसभरातील ११ ते ११.३० तास प्रत्येक हाड दुखेपर्यंत आम्ही मेहनत करत आहोत. (Vedat Marathe Veer Daudle Saat)
त्यामुळे हे असं पात्र करताना जेव्हा आम्हाला हॉर्स रायडींगसुद्धा येत नाही तर ते आव्हानात्मक असतं. पण जेव्हा आपले मित्र आपल्या डोळ्यासमोर मरणार आहेत हे त्या मावळ्यांना माहित होत आणि तेव्हा ते भिडले. त्यामुळे या भूमिका साकारताना एक जबाबदारी आहे. ज्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्नशील आहोत. म्हणूनच जेव्हा हि भूमिका मी साकारतो आहे तेव्हा मी उत्कर्ष शिंदे आहे.. मी सिंगर आहे.. ऍक्टर आहे किंवा मी चांगला डान्स करतो हे विसरून जाऊन यात स्वतःला झोकून देणं महत्वाचं आहे आणि तेच मी करण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय’ (Vedat Marathe Veer Daudle Saat)
Discussion about this post