हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियावर आपल्या अदाकारीसाठी नेहमीच चर्चेत असणारी सबसे कातिल.. गौतमी पाटील दिवसेंदिवस यशाची शिखरे गाठताना दिसते आहे. आतापर्यंत ठिकठिकाणी कार्यक्रम केल्यानंतर तिने काही सॉंग अल्बम केल्याचेही समोर आले. गौतमीचा कार्यक्रम असेल आणि अख्खा गाव जमा झाला नाही तर नवलंच! अशा गौतमी पाटीलला मराठी संगीत विश्वातील लोकप्रिय शिंदे घराण्यातून एक खास ऑफर देण्यात आली आहे. प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा मुलगा डॉ. उत्कर्ष शिंदेने गौतमीसोबत एक जबरदस्त लावणी करण्याचे योजिले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांच्या भेटीचे फोटो देखील व्हायला होत आहेत. मात्र काही नेटकऱ्यांनी उत्कर्षला पुन्हा विचार करण्याबाबत सांगितले आहे.
शिंदेशाहीचा एक अविभाज्य भाग असणारा उत्कर्ष शिंदे हा ‘बिग बॉस मराठी’तून प्रकाश झोतात आला. पेशाने उत्कर्ष डॉक्टर असला तरीही त्याच्या रक्तात गायन आहे. शिवाय तो एक उत्तम अभिनेता आणि इंटरटेनरसुद्धा आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ऐतिहासिक चित्रपटातदेखील तो एक महत्वपूर्ण भूमिका साकारतो आहे. याशिवाय गौतमीसोबत चालू असलेल्या प्रोजेक्टबाबत तो स्वतः उत्सुक आहे. याची माहिती देणारी एक पोस्ट त्याने शेअर केली होती. ज्यात लिहिलंय, ‘अहो शेट लय दिसान झालीया भेट.. ह्या माझ्या संगीतबद्ध केलेल्या सुपरहिट लावणीनंतर ह्यावर्षी लवकरच तुम्हा सर्वांसाठी…माझं नवं लिखाण नवं संगीत नव्या गायकेसोबत खूप साऱ्या नवीन लावण्या घेऊन येणार…लवकरच’
लावणी नृत्यांगना गौतमी पाटील चर्चेत असण्याची बरीच कारणे आहेत. कधी अंगप्रदर्शन करून नाचणे, कधी ट्रोलिंगवर प्रत्युत्तर देणे, कार्यक्रमात राडे असा विविध कारणांमुळे गौतमी चर्चेत राहिली आहे. अलीकडेच तिचा एक व्हिडीओ लीक झाल्याच्या घटनेने मनोरंजन विश्वात खळबळ उडाली होती. यानंतर आता उत्कर्ष शिंदेसोबत गौतमी पाटील काम करत असल्याचे समोर आल्यानंतर अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी नेहमीप्रमाणे ट्रोलिंगचा अजेंडा कायम राखला आहे. अनेकांनी उत्कर्ष शिंदेला पुन्हा विचार करण्याचा सल्ला देखील दिला आहे. इतकेच नव्हे तर एका नेटकऱ्याने असेही म्हटले आहे कि, ‘आम्ही तुमचे खूप मोठे चाहते आहोत… फक्त विचार करून गाणं तयार करा.. कृपया यामध्ये अंगप्रदर्शन नको’. आता उत्कर्षच्या सुपीक कल्पनांमधून नेमकं काय बहरणार हे पाहण्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.
Discussion about this post