हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘इंडियन आयडल १२’ हा शो यंदाच्या वर्षातील अत्यंत वादग्रस्त शो होता. प्रत्येक बारीक सारीक गोष्टी इतक्या मोठ्या व्हायच्या कि बस.. मग ट्रोलिंगचा पाऊस आणि प्रेक्षकांचा रोष.. बापरे.. पण या सगळ्यातही इंडियन आयडॉल १२ मध्ये असे काही स्पर्धक होते ज्यांच्या आवाजावर प्रेक्षक फिदा होते. त्यामुळे या स्पर्धेची ट्रॉफी आणि विजेतेपद कुणाच्या नवे होते हि मोठी कुतूहलाची बाब होती आणि अखेर हि प्रतीक्षा काल संपली.
इंडियन आयडॉल १२ च्या अंतिम सत्रात उत्तराखंडच्या पवनदीप राजनने विजेतेपद मिळवले तर अरूणिता कांजीलाल उपविजेती ठरली.
पवनदीप राजन व अरूणिता हे दोघेही शोच्या विजेतेपदाचे शक्तिशाली दावेदार होते. परंतु चाहत्यांच्या मतांच्या आधारावर पवनदीपने विजेतेपद मिळविले. ‘इंडियन आयडल १२’ ची ट्राफी आणि त्याचसोबत २५ लाखांचा धनादेश देऊन पवनदीपला गौरविण्यात आले. शोचा जज सोनू कक्कर, अनु मलिक आणि हिमेश रेशमिया यांच्यासह हा सोहळा बहारदार झाला. तर चित्रपट जगतातील अनेक सेलिब्रिटींनीही यावेळी हजेरी लावली होती. जावेद अली, मनोज मुंतशीर, उदित नारायण, कुमार सानू, मिका सिंग, अल्का याग्निक अशा अनेक दिग्गजांनी ग्रेट ग्रँड फिनालेमध्ये बहारदार परफॉर्मन्स केले. शोच्या माजी स्पर्धकांनीही आपली गायकी दाखवली. दरम्यान प्रत्येकजण गाताना, अनु मलिक पियानो वाजवत होते. तर सुखविंदर सिंह यांनी मोहम्मद दानिशसोबत ‘लगन लागी’ हे गाणे सादर केले़.
यासह हिमेश रेशमियाने निहालसोबत परफॉर्म देताना ‘चलाओं ना नॅनो से बाण रें’ हे गाणं गायले. तर निहालने ‘तेरा चेहरा’ हे गाणं गायले. अल्का याग्निक आणि पवनदीप यांची जुगलबंदीदेखील यावेळी पाहायला मिळाली. ‘राहों में उनसे मुलाकात हो गई’ हे गाणं सादर करत त्यांनी सर्वांच्या मनाला हात घातला. शिवाय मिका सिंगने सर्व स्पर्धकांसोबत रॉकिंग परफॉर्मन्स दिले. इतकेच नव्हे तर इंडियन आयडल १२ च्या ग्रेट ग्रँड फिनालेमध्ये अन्नू कपूर यांच्यासोबत स्पर्धक व शोच्या जजेसनी अंताक्षरीही खेळली. दरम्यान अनु मलिकच्या संघाने बाजी मारली आणि या संघाला विजयावर विशेष भेटवस्तूदेखील देण्यात आली.
Discussion about this post