Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘उपवासाने मी बारीक झाले तर..?; चाहत्याच्या प्रश्नावर वनिता खरातचं भन्नाट उत्तर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 29, 2022
in Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Vanita Kharat
0
SHARES
122
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय कॉमिक शो म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मी या मालिकेने गेली अनेक वर्ष विविध पात्र, विविध गोष्टींसह इरसाल कलाकृती सादर केल्या आहेत. या शोमचा एक अविभाज्य भाग म्हणजे यातील हास्यविर महारथी. ज्यामध्ये अभिनेत्री वनिता खरातचा समावेश आहे. कधी उत्तरप्रदेशची बाई तर कधी धनीचा ओरडा खाणारी प्रेमळ सासूबाई. इतकाच काय तर कधी लहान वनी होऊन जगणं मुश्किल करणारी वनिता सगळ्यांचीच लाडकी आहे. नुकतीच नवरात्रीनिमित्त ती सोनी मराठीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून लाईव्ह आली होती. यावेळी तिने वैयक्तिक आयुष्याविषयी काही गोष्टी आणि काही अनुभव शेअर केले.

View this post on Instagram

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

एखादी अभिनेत्री बारीक, सुंदर, नाकी डोळी नीट, गोरी आणि सडपातळ बांधा असणारी असावी असे सगळ्यांनाच वाटते. पण निर्मिती सावंत, विशाखा सुभेदार आणि आता वनिता खरात यांसारख्या कलाकारांनी अभिनेत्रीची व्याख्या पूर्ण बदलली आहे. आपण नेऊ तसा प्रवाह आणि करू तसे मनोरंजन अशी वृत्ती बाळगून अविरत प्रेक्षकांना हसवणाऱ्या या अवली कधी मनाला भावल्या कळलंच नाही. विनोदाचं जबर टायमिंग, दर्जेदार अभिनय यामुळे वजन बीजन गेलं उडत.. बघायचं काय तर.. फक्त आणि फक्त वनीचा अभिनय अशी मानसिकता प्रेक्षकांचीही तयार झाली. यामुळे आज लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये वनिता खरात हे नाव आवर्जून घेतले जाते.

View this post on Instagram

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

यावेळी ती सोनी मराठीच्या इंस्टा पेजवर लाईव्ह आली असताना तिने चाहत्यांशी मनसोक्त गप्पा मारल्या. यावेळी तिने वजन, मेकअप आणि इतर अशा अनेक गोष्टींवर आपले मत मांडले. दरम्यान एका चाहत्याने ‘तुम्ही नवरात्रीचे उपवास करता का..?. असे विचारले असता यावर वनिताने अतिशय भन्नाट उत्तर दिले. ती म्हणाली कि, ‘नवरात्रीचे उपवास मी कधीच करत नाही. कारण उपवासाने मी बारीक झाले तर…’ या गंमतीशीर उत्तराने मन जिंकलास वने.

View this post on Instagram

A post shared by Vanita Kharat (@vanitakharat19)

तुम्हालाही हसू आवरलं नसेलच. या सेशनमध्ये आणखी एकाने तिला मेकअपविषयी विचारले असता ती म्हणाली कि, ‘मला मेकअपची फारशी आवड नाही. त्यामुळे मला मेकअप करायला अजिबातहा आवडत नाही. मला अगदी साधेपणा आवडतो. बघा आताही मी लाइव्हसाठी अगदी मेकअप न करता बसली आहे.’ वनिताच्या लाईव्ह साठी अनेक प्रेक्षकांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.

Tags: Instagram PostMaharashtrachi hasyajatraSony MarathiVanita KharatViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group