Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात घेऊन येतेय भाबड्या लोकांची डांबरट गोष्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 23, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Vanita Kharat
0
SHARES
104
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावर कॉमिक रिऍलिटी शोमध्ये सोनी मराठीच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने यशाची मोठी झेप घेतली आहे. हा कार्यक्रम सध्या आघाडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमांच्या यादीत नंबर एक मानला जातो. या शोच्या माध्यामातून अनेक कलाकारांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. यामध्ये अभिनेत्री वनिता खरातने स्वतःच्या अभिनयाची एक वेगळीच छाप प्रेक्षकांवर सोडली आहे. विविध पात्र साकारून तिने नेहमीच प्रेक्षकांना हसवलं आहेए. तीच वनी आता मोठ्या पडद्यावर आपल्या भेटीला येत आहे. याबाबत माहिती देणारी पोस्ट तिने शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Vanita Kharat (@vanitakharat19)

अभिनेत्री वनिता खरात हि बॉलिवूडचा गाजलेला चित्रपट ‘कबीर सिंग’नंतर आता मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर करत तिने याबाबत माहिती दिली आहे. अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवरून वनिताने ‘सरला एक कोटी’ या आगामी मराठी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘डाव लागलाय मोठा.. काही लागणा मेळ…येडं झालंय गाव सारं…सुरू झालाय खेळ… भाबड्या लोकांची डांबरट गोष्ट… ‘सरला एक कोटी’ २० जानेवारीपासून चित्रपटगृहात! #सानवी_प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत, सत्य घटनेवरून प्रेरित…’

View this post on Instagram

A post shared by Vanita Kharat (@vanitakharat19)

‘सरला एक कोटी’ हा चित्रपट येत्या वर्षात २० जानेवरी २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन नितीन सिंधुविजय सुपेकर यांनी केले आहे. मुख्य या चित्रपटातील मुख्य भूमिकेत हास्यजत्रा फेम ओंकार भोजने दिसणार आहे आणि त्याची सरला म्हणून आपल्या भेटीला ईशा केसकर येणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Vanita Kharat (@vanitakharat19)

या चित्रपटात वनिता खरातशिवाय छाया कदम, कमलाकर सातपुते, रमेश परदेशी, सुरेश विश्वकर्मा, विजय निकम, अभिजीत चव्हाण, यशपाल सरताप, जतीन ईनामदार, महेंद्र खिल्लारे, रमाकांत भालेराव, कपिल कांबळे, शाम मते, शुभम खरे, योगेश इरतकर, अभिलाषा पॉल हे कलाकार अन्य महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Tags: Instagram PostSarala Ek KotiUpcoming Marathi MovieVanita Kharatviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group